गोपाळा लहांगे – वाडीवऱ्हे गटासह इगतपुरी मतदारसंघाचे भविष्य बदलवणारे व्यक्तीमत्व : वाडीवऱ्हे गटातुन त्यांना जिल्हा परिषद सदस्य करण्याचा निर्धार 

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील सर्वात चर्चेत असलेल्या वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटातील रस्ते, पाणीपुरवठा योजनेचे व इतरही असलेले अर्धवट स्थितीतील कामे, धरणग्रस्तांच्या उर्वरित जमिनीसह इतर अनेक प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबितच आहेत. ह्या प्रश्नांवर आजवर कुणीही ठोस भुमिका न घेतल्याने हे प्रश्न आजही “जैसे थेच” आहे. यावर ठोस भूमिका घेऊन हे प्रश्न तडीस नेण्यासाठी इगतपुरी पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळा लहांगे हे सक्षम आणि कणखर नेतृत्व आहे. जिल्हा परिषदेवर गोपाळा लहांगे यांना पाठवल्यास वाडीवऱ्हे गटासह इगतपुरी तालुक्याचेही अनेक प्रश्न तडीस जातील. गेल्या ३५ वर्षांपासुन गोपाळा लहांगे हे राजकारणात सक्रिय आहेत. मात्र त्यांच्या आक्रमक, अभ्यासु व सडेतोड भूमिकेमुळे त्यांना जाणीवपूर्वक निवडणुकांवेळी लक्ष करून डावलले जात असल्याचा आजवरचा इतिहास आहे. २०१२ नंतर ते इगतपुरी पंचायत समितीवर वाडीवऱ्हे गणातून तर ॲड. संदीप गुळवे हे वाडीवऱ्हे जिल्हा परिषदेवर निवडुन आले होते. त्यावेळी गोपाळा लहांगे इगतपुरी पंचायत समितीवर सभापतीपदावर विराजमान झाले. सभापतीपदाच्या कारकिर्दीतील त्यांची काम करण्याची शैली ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना शिस्त लाऊन गेली हे कुणीही नाकारू शकत नाही. त्यानंतर विधानसभा मतदारसंघातील समस्यांचाही अभ्यास असलेले गोपाळा लहांगे यांना जाणीवपूर्वक दूर ठेऊन अनेकदा या मतदारसंघात हक्काचा व स्थानिक भूमिपुत्र उमेदवारीपासून डावलला गेला. या आधीच्या विधानसभा असो की, जिल्हा परिषद निवडणूक असो अनेकवेळा आयात उमेदवार लादला गेला. मात्र यात समस्यांचा डोंगर कमी होण्याऐवजी वाढतच गेला. वाडीवऱ्हेसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात जिल्हा परिषद सदस्य होण्याचा मान जवळ येऊनही दूर गेल्याने या गावाला जिल्हा परिषद सदस्यत्व मिळालेच नाही. मात्र यंदाच्या निवडणुकीत सर्वगुणसंपन्न व अनुभवी उमेदवार म्हणून वाडीवऱ्हेचे व इगतपुरी पंचायत समितीचे प्रतिनिधित्व केलेले गोपाळा लहांगे यांच्या रूपाने सर्वांगाने सक्षम उमेदवार मिळाला आहे. वाडीवऱ्हे गावाला जिल्हा परिषदेचे सदस्य मिळण्याची होण्याची सुवर्ण संधी मिळेल व त्यासाठी गावापासून ते जिल्हा परिषद गटातील दोन्ही गणातील मतदारांची लोकभावना ही गोपाळा लहांगे यांच्यावरच असल्याची भावना काही जेष्ठ मंडळींनी बोलुन दाखवली.

error: Content is protected !!