इंदिरा काँग्रेसच्या वाडीवऱ्हे गटप्रमुखपदी आकाश दिवटे यांची निवड

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

इंदिरा काँग्रेसच्या वाडीवऱ्हे गटप्रमुखपदी नांदुरवैद्य येथील आकाश दिवटे यांची निवड करण्यात आली आहे. घोटी येथील काँग्रेसच्या बैठकीप्रसंगी काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यांनी ह्या निवडीची घोषणा केली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत महत्वाची भुमीका बजावणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी लवकरच करण्यात येणार आहेत. घोटी येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या उपस्थितीत तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांच्या पदग्रहण सोहळ्याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यांनी आकाश दिवटे यांच्या निवडीची घोषणा केली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!