इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
अनेक व्यापारी शेतकऱ्यांचा माल घेऊन पैसे न देता पळून जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे आमदार राहुल ढिकले यांनी सांगितले. डॉक्टर किसान आणि जय किसान फार्मर्स फोरमतर्फे वरदलक्ष्मी कार्यालयात झालेल्या डॉक्टर किसान डायरी प्रकाशन आणि शेतकरी संवाद कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलते होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उध्दव निमसे होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला डॉक्टर किसानचे संस्थापक संचालक सुनिल दिंडे यांनी प्रास्तविकाद्वारे संस्थेचे उद्देश व उपक्रमाबद्दल माहिती दिली. उध्दव निमसे यांनी डॉक्टर किसान शेतकऱ्यांना करीत असलेल्या मार्गदर्शनाबद्दल कौतुक केले. जय किसान फोरमचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय जाधव, ओम गायत्री नर्सरीचे संचालक मधुकर गवळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुंबई आकाशवाणीचे डॉ. संतोष जाधव, सेंद्रिय शेतीतज्ञ सदूभाऊ शेळके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर किसान डायरीचे प्रकाशन झाले.
कार्यक्रमात डॉक्टर किसान कृषीभूषण, युवा उद्योजक, कृषी उद्योजक, तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या २९ जणांना पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
त्यामध्ये शांताराम वाळू कमानकर, निवृत्ती विश्वनाथ न्याहारकर, रावसाहेब खंडेराव थेटे, डॉ. कैलास पर्वत खैरनार, निखिल विलास शिंदे, राजाराम विठ्ठल खैरनार, संपत सावळीराम कांदळकर, श्रीकांत जिभाऊ पगार, पांडुरंग कचरु कापडी, योगेश विठ्ठलराव माळोदे, दत्तू शंकर शिंदे, गणेश तानाजी पडवळ, रमेश पंढरीनाथ कोकाटे, बाळासाहेब दामू ढिकले, विलास पांडुरंग भोसले, संजय मनोहर गुंड, तुळशीराम हनुमंत गडदे, लक्ष्मण परसराम खोसकर, दीपक विठ्ठल वाजे, गोकूळ हिरामण ढगे, विकास शंकरराव निखाडे, भरत नरोडे, पांडुरंग रावबा चव्हाण, नवनाथ लक्ष्मण पिंगळ, संदीप सयाजीराव काळे, विलास नानाजी कटारे, संजीवनी संजय मोकाशी, विजय सोनवणे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सागर पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. तुषार वाघुळदे यांनी सूत्रसंचालन तर प्रशांत दिंडे यांनी सर्वांचे आभार मानले.