नाशिक जिल्ह्यात होणार आजपासून २ दिवस गलगंड आजाराचे पुनःसर्वेक्षण

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

नाशिक जिल्ह्यातील निवडक 30 गावांमध्ये गलगंड आजाराचे 15 व 16 मार्च या दोन दिवसामध्ये एकाच वेळेस सर्वेक्षण होणार आहे. प्रत्येक गावांमध्ये तीन आरोग्य अधिकारी व कर्मचारी हे सर्वेक्षण शालेय पातळीवर करणार असून यामध्ये खाण्यातील मिठाचे, लघवीचे नमुने घेऊन पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. गलगंड आजार सॅम्पल सर्वेक्षण हे साधारणपणे दर पाच वर्षांनी करण्यात येते. यावर्षी या सर्वेक्षण मोहिमेचे आयोजन नाशिक जिल्ह्यात करण्यात आले आहे. त्यामुळे गलगंड आजाराचे समाजामधील प्रमाण, आहारातील आयोडीनचे प्रमाण किती आहे याविषयी अभ्यास करण्यात येईल.

आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नाशिक आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग नाशिक येथील जिल्हा प्रशिक्षण पथक यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे गलगंड पुनःसर्वेक्षण करणेबाबत एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. उदघाटन प्राचार्य डॉ. सुशील वाकचौरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये, कार्यक्रमाचे मुख्य अधिकारी डॉ. अनिल सोनवणे, राहुल बियाणी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. 

सर्वेक्षणाच्या सूक्ष्म नियोजनासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र येथे आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांचे एक दिवसीय प्रशिक्षण झाले. यामध्ये सर्व्हे कसा करावा मीठ, लघवी नमुने कशा पद्धतीने जमा करावे याविषयीचे तांत्रिक ज्ञान देण्यात आले. प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. सुशील वाकचौरे, डॉ. कपिल आहेर, राहुल बियाणी, डॉ. अनिल सोनवणे आदींनी मार्गदर्शन केले. सर्व्हेतून येणारे निष्कर्ष हे जिल्ह्यातील आयोडीन न्यूनता विकार कार्यक्रम कशा पद्धतीने राबवावा याबाबत राज्य स्तरावर धोरण ठरविण्याबाबत मार्गदर्शक ठरणार आहे  कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा प्रशिक्षण पथक येथील डॉ. हिमानी चांदेकर, सुभाष कंकरेज, रमेश बागुल, उदय जाधव इत्यादी अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!