
इगतपुरीनामा न्यूज – नाशिकच्या हितासाठी व सेवेसाठी जगणे, मरणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय आहे. मी माझ्या रक्ताचा प्रत्येक थेंब गोरगरिबांसाठी अर्पण केला आहे. प्रत्येकाचे जीवन उन्नत झाले पाहिजे. म्हणून सर्वांनी नाशिकच्या उन्नतीसाठी हातभार लावावा असे आवाहन जागृत नाशिक जागृत भारत अभियानाचे प्रवर्तक स्वामी श्रीकंठानंद यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील शिदवाडी येथे स्वामी श्री कंठानंद यांच्या माध्यमातून सायकली व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रहारसेवक सपन परदेशी यांनी केले होते. याप्रसंगी खंबाळेच्या सरपंच द्वारकाबाई कैलास शिद, बाजार समिती संचालक तथा उपसरपंच दिलीप चौधरी, कुर्णोलीचे सरपंच गुरुनाथ जोशी, वाकीचे सरपंच किसन कुंदे, ग्रामपंचायत सदस्य मयुर डोळस, उत्तम पारधी, एकनाथ शिद, निवृत्ती खडके, निवृत्ती शिद, कैलास शिद, सामाजिक कार्यकर्ते दत्तू कापसे, मुकुंद वारघडे, बाळू खाडे, शिक्षक सूर्यवंशी, शिरसाठ, चंदर ठाकरे, आनंदा शिद, अमृता आघाण, बहिरू शिद, शंकर शिद, बबन शिद, आनंदा शिद, लाभार्थी मयुरी जोशी, आशा शिद, प्रशांत कडाळे, मोहित परदेशी आदी उपस्थित होते.