इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
आज सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमाराला इगतपुरी तालुक्यातील साकुर फाटा भागातील ३ दुकानांना आग लागली. आगीमुळे तिन्ही दुकाने भस्मसात झाली आहेत. ग्रामस्थांनी आग विझवण्याचा अयशस्वी केला मात्र त्यामध्ये यश आले नाही. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून वाडीवऱ्हे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
साकुर फाटा येथील विकास देवगिरे यांचे सुमंगल इलेक्ट्रिकल्स हे दुकान असून यामध्ये लाखो रुपयांचे साहित्य होते. आज रात्री साडेसात वाजेच्या सुमाराला ह्या दुकानाला आग लागली. ह्या आगीच्या विळख्यामुळे शेजारील समाधान जाधव यांचे सलून दुकान आणि नव्याने सुरू होत असलेले कपड्यांचे दुकान भक्ष्यस्थानी सापडले. आगीचे रौद्रस्वरूप पाहून परिसरातील ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात यश आले नाही. ह्या घटनेत तिन्ही दुकानातील सर्व साहित्य भस्मसात झाले. वाडीवऱ्हे पोलिसांना माहिती समजताच त्यांनी नोंद घेऊन तपास सुरू केला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक कारण असल्याचे समजते.
आगीचा व्हिडिओ पहा