सर्वाधिक १७ उमेदवार असल्याने एका मतदान केंद्रावर लागणार २ मतदान यंत्र : असे आहेत उमेदवार, त्यांचा क्रम आणि चिन्ह

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात आहेत. २ तालुक्यात ३०० मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर २ मतदान यंत्र लावले जाणार आहे. मतदान यंत्रावर म्हणजे एका बॅलेट युनिटवर एकूण १६ उमेदवारांची नावे समाविष्ट होतील, अशी रचना असते. त्यानुसार मतपत्रिका तयार केली जाते. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनंतर मतपत्रिकेवर वरीलपैकी कोणीही नाही (नोटा) हे चिन्ह असते. ज्या ठिकाणी १५ उमेदवार निवडणूक लढवित आहेत, तिथे १५ उमेदवार आणि १६ व्या क्रमांकावर नोटा अशी मतपत्रिकेची रचना असते. इगतपुरी विधानसभा मतदारसंघात एकूण १७ उमेदवार आणि एक नोटा अशी रचना करावी लागणार असल्याने एका मतदान केंद्रात दोन मतदान यंत्र लागणार आहेत.

निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराचा अनुक्रम आणि त्यांचे चिन्ह निश्चित करण्यात आले आहे. ते खालीलप्रमाणे आहे. 1. काशिनाथ दगडू मेंगाळ पक्ष मनसे, चिन्ह रेल्वे इंजिन, 2. खोसकर हिरामण भिका पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, चिन्ह घड्याळ, 3. धनाजी अशोक टोपले पक्ष बसपा, चिन्ह हत्ती, 4. लकीभाऊ भिका जाधव पक्ष इंदिरा काँग्रेस, चिन्ह पंजा, 5. अनिल दत्तात्रय गभाले पक्ष जन जनवादी पार्टी, चिन्ह करवत, 6. अशोक वाळू गुंबाडे पक्ष पिझन्टस अँड वर्कस पार्टी, चिन्ह प्रेशर कुकर, 7. कांतीलाल किसन जाधव पक्ष भारत आदिवासी, चिन्ह पार्टी हॉकी आणि बॉल, 8. चंचल प्रभाकर बेंडकुळे पक्ष स्वाभिमानी, चिन्ह शिट्टी, 9. भाऊराव काशिनाथ डगळे पक्ष वंचित बहुजन आघाडी, चिन्ह गॅस सिलेंडर, 10. शरद मंगलदास तळपाडे पक्ष स्वराज्य, चिन्ह पेनाची निब सात किरणांसह, 11. कैलास सदू भांगरे अपक्ष, चिन्ह ट्रम्पेट, 12. गावित निर्मला रमेश अपक्ष, चिन्ह बादली, 13. जयप्रकाश शिवराम झोले अपक्ष, चिन्ह ऑटो रिक्षा, 14. बेबी ( ताई ) हरिचंद्र तेलम अपक्ष, चिन्ह खाट, 15. भगवान रामभाऊ मधे अपक्ष, चिन्ह बॅट, 16. शेंगाळ विकास मोहन अपक्ष, चिन्ह अंगठी, 17. शंकर दशरथ जाधव अपक्ष दूरदर्शन, 18. नोटा

Similar Posts

error: Content is protected !!