आमदार खोसकरांच्या प्रयत्नातून आरोग्य केंद्रांसाठी ५ रूग्णवाहिका

इगतपुरीनामा न्यूज, दि. २३ ( ज्ञानेश्वर महाले, त्र्यंबकेश्वर )

आमदार हिरामण खोसकर यांच्या प्रयत्नातून त्र्यंबकेश्वर तालुक्यासाठी ५ रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. अंजेनेरी व चिंचओहोळ आरोग्य केंद्राला दोन रूग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार खोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्र्यंबकेश्वर, हरसुल, मुलवड येथे काही दिवसात रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे आमदार यांनी सांगितले.

यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे, पंचायत समिती सदस्य रविंद्र भोये, माजी सरपंच कैलास बेंडकोळी, जयराम मोंढे, गणेश कोठुळे, सागर चव्हाण, रोहीत सकाळे, गटविकास अधिकारी किरण जाधव, वैद्यकीय अधिकारी डाॅ. रेखा सोनवणे, डाॅ. पुष्पा बर्वे, तालुका वैद्यकीय अधिकारी मोतीराम पाटील आदी उपस्थित होते.

तालुक्यातील कोरोनाची अवस्था पाहता बाधित रूग्णासाठी रूग्णवाहिकेची कमतरता वेळोवेळी जाणवत असल्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी शासन स्तरावर प्रयत्न करून रूग्णवाहीका मिळवली. लोकांकडून त्याचे आभार मानले जात आहे. ह्या रूग्णवाहिकेत सर्व अत्यावश्यक यंत्रणा असणार आहे.

त्र्यंबकेश्वर तालुका भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या भागात विभागला गेला आहे. त्यामुळे प्रत्येक आरोग्य केंद्रात रूग्णसेवेसाठी रूग्ण वाहिका २४ तास उपलब्ध असणे आवश्यक आहे. याचा विचार करून शासनाकडून पाच रूग्णवाहिका तालुक्यासाठी मिळवल्या. लवकरच उर्वरित ठिकाणी सुसज्ज रूग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रयत्न करू.
- हिरामण खोसकर, आमदार

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!