सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
त्र्यंबकेश्वर पासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गोरठाण येथे दसऱ्याच्या मुहूर्तावर आठवडे बाजाराचा शुभारंभ झाला. हरसूल गटाचे नेते विनायक माळेकर, पंचायत समितीचे सभापती मोतीराम दिवे यांच्या हस्ते करण्यात आला. या बाजाराचा आसपासच्या गावाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. भविष्यात गोरठाण येथून नाशिक, पुणे, मुंबई, व इतर ठिकाणी व्यापार करण्याची संधी ग्रामीण भागातील लोकांना मिळणार आहे. स्थानिक तसेच ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपल्बध होतील.
गोरठाण हे हरसूल-त्र्यंबक-गिरणारे ,या तिन्ही बाजार पेठांचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने पुढील काळात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळु शकते. तालुक्यात भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होत असून लोकांना प्रत्यक्ष व्यापाऱ्यांशी व्यवहार करता येईल. दैनंदिन गोष्टीकरिता तालुकाच्या ठिकाणी जावं लागतं होतं, पण आता गोरठाण तसेच आसपासच्या प्रामुख्याने माळेगाव, वाघेरा, कोणे, साप्ते, गणेशगाव ( वा ), वेळूंजे, हेदुलीपाडा, हेडपडा, नांदगाव कोहळी, वरसविहिर, पत्र्याचापाडा या गावांना फायदा होईल.
हा बाजार दर सोमवारी सुरू राहणार आहे. आसपासच्या लोकांनी तसेच व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी हरसूल गटाचे नेते विनायक माळेकर, पंचायत समितीचे सभापती मोतीराम दिवे, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती युवराज कोठुळे, रवींद्र भोये, हरिभाऊ बोडके, राहुल काशीद, सरपंच नथु उदार, शरद महाले, उपसरपंच पांडुरंग भडांगे, ग्रामसेवक सांगळे पोलीस पाटील, वसंत भडांगे, जय मल्हार मित्र मंडळाचे गणपत भडांगे, राजेंद्र दिवटे, ज्ञानेश्वर सकवद, पंकज नेमनोर, भास्कर भडांगे, पप्पु बाबुराव भडांगे, वसंत भडांगे, पप्पू भडांगे,दत्तू वाटणे, ज्ञानेश्वर बिडगर, काँग्रेस नेते भावडू बोडके, काशिनाथ ( राजू ) बोडके, नाना कसबे, बाजीराव भडांगे, मधुकर भडांगे आदी उपस्थित होते.