इगतपुरीनामा न्यूज – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील चिखलवाडी पो. सामुंडी येथील सर्वहरा परिवर्तन केंद्र या ठिकाणी असलेल्या शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनींना बळजबरीने नाचवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजू उर्फ वादीराज भीमराज नाईक रा. राणेनगर नाशिक आणि शिक्षिका माधुरी गवळी यांच्या विरोधात मुलींच्या पालकांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षिका माधुरी गवळी मुलींना छडीने मारहाण करून दमदाटी व जबरदस्तीने नाचण्यास भाग पाडत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. ह्या धक्कादायक प्रकारामुळे इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. संशयित आरोपी अद्याप अटक करण्यात आलेले नाहीत. या घटनेचा संपूर्ण तपास नासिक ग्रामीण उपअधिक्षक संदीप भामरे यांच्याकडे देण्यात आला आहे. एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान मधे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक आणि महिला बाल हक्क आयोगाकडे तक्रार केली आहे. महिला बाल हक्क आयोगाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत अशी माहिती श्री. मधे यांनी दिली.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group