

इगतपुरीनामा न्यूज – घोटी बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. महिला राखीव गटातील लता निवृत्ती गोवर्धने ह्या उमेदवारांनी लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. त्यांनी निवडणुकीमध्ये महिला राखीव या जागेवर उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु घरगुती कामात व्यस्त असल्यामुळे त्यांना माघारीचा अर्ज वेळेत दाखल करता आला नाही. त्यामुळे निवडणुकीत त्यांचे नांव व निशाणी बॅलेट पेपरवर आली आहे. त्यामुळे लता निवृत्ती गोवर्धने यांनी जाहीर खुलासा करून शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. माझ्या सर्व हितचिंतकांनी लोकनेते स्व. गोपाळरावजी गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्यात यावे असे आवाहन सौ. गोवर्धने यांनी केले आहे. लोकनेते स्व. गोपाळरावजी गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार आहे. आपले मत म्हणजे विकासाला मत असल्याचे पॅनलच्या नेत्यांनी सांगितले.