इगतपुरीचा शिक्षण विभाग तालुक्यातील धास्तावलेल्या विद्यार्थिनी आणि पालकांना कधी आधार देणार? : वंचित बहुजन आघाडीचा संतप्त सवाल : शिक्षणमंत्र्याच्या निवासस्थानी आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – टाकेद बुद्रुकच्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर  मुख्याध्यापक व शिक्षकाने अत्याचाराच्या घटनेमुळे तालुकाभरातील विद्यार्थिनी आणि महिला पालक अत्यंत घाबरून गेल्या आहेत. पोटासाठी कामावर जावे किंवा शेतमजुरी करावी की मुलींच्या सुरक्षिततेची चिंता करावी अशी द्विधावस्था वाढली आहे. महिलांमध्ये आणि सोशल मिडीयामध्ये महिला आपली भीती व्यक्त करताहेत. एवढी भयानक घटना घडून ऐन परीक्षा […]

शिक्षक संघटना सरसावल्या ; टाकेद प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षेची निवेदनाद्वारे मागणी

इगतपुरीनामा न्यूज – टाकेद बुद्रुक ता. इगतपुरी येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा इगतपुरी तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टावर चालवण्यात यावे. संबंधित नराधमांना अधिकाधिक कठोर शिक्षा करावी अशी सर्व शिक्षक संघटनांची मागणी आहे. त्याबाबतचे निवेदन सर्व शिक्षक संघटनांच्या वतीने इगतपुरीचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व […]

काय सांगता ? – टाकेदच्या पीडित विद्यार्थिनीचे “बदलापूर” प्रकरणाशी कनेक्शन ? : “बिचारी” विद्यार्थिनी फुफाट्यातून पडली अत्याचाराच्या आगीत : एल्गार कष्टकरी संघटनेच्या महिलांकडून पीडितेशी चर्चा

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथील सहावीच्या विद्यार्थिनीवर शाळेच्या नराधम मुख्याध्यापकाने शिक्षकाच्या मदतीने अत्याचार घडल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण आहे. १३ वर्षीय पीडित विद्यार्थिनीचे ‘बदलापूर” येथे घडलेल्या घृणास्पद घटनेशी कनेक्शन असल्याचे समजले आहे. पीडित विद्यार्थिनी बदलापूर येथील शाळा सोडून टाकेद बुद्रुक शाळेत जुनपासून शिकत आहे. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाशी एल्गार […]

टाकेद अत्याचार प्रकरण – इगतपुरी तालुक्यातील सर्व शिक्षकांची, अधिकाऱ्यांची तातडीने पोलीस चारित्र्यपडताळणी करा : याशिवाय वेतन अदा न करण्याची राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील टाकेदच्या विद्यार्थिनीवरील मुख्याध्यापक आणि शिक्षकाच्या उघडकीस आलेल्या प्रकरणामुळे इगतपुरी तालुका राज्यात बदनाम झाला आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पर्यवेक्षिय कामकाजात अक्षम्य हलगर्जीचा हा दुष्परिणाम आहे. इगतपुरी तालुक्याचे निसगसौंदर्य असणाऱ्या आणि महामार्गावरील हॉटेल फार्महाऊसवर अधिकारी आणि शिक्षक यांच्या ओल्या सुक्या पार्ट्या होत असल्याच्या गंभीर तक्रारी आहेत. यासह संबंधित काही अधिकारी आणि शिक्षक […]

शेणवड बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात

इगतपुरीनामा न्यूज – शेणवड बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न झाला. आज सकाळी ८ वाजेपासून  ह्या मेळाव्याला प्रारंभ झाला आहे. गावासह परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे पालक आदींनी उपस्थित राहून मेळाव्याचा आनंद लुटला. शाळेतील विद्यार्थ्यांनी भाजीपाला, खाण्याचे स्टॉल, वडापाव, पाणीपुरी, खाऊचे दुकान, चहा, रस, फळाचे स्टॉल, चायनीज, मन्चुरिअन स्टॉल लावले आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांना व्यवसायाची आवड […]

आजीवन अध्ययन विस्तार विभागांतर्गत आरोग्य साक्षरता व महिला सबलीकरण कार्यक्रम : कला व वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी येथे आयोजन

इगतपुरीनामा न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत नाशिप्रचे कला व वाणिज्य महाविद्यालय इगतपुरी आणि आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य साक्षरता व महिला सबलीकरण कार्यक्रम संपन्न झाला. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथा प्राचार्य प्रतिभा हिरे होत्या. सध्याच्या धावपळीच्या काळात आपली जीवनशैली बिघडल्याने आपल्या आरोग्याची हेळसांड झाली. […]

इगतपुरी महाविद्यालयात निर्भय कन्या अभियानांतर्गत कार्यशाळा आणि व्याख्याने संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ आणि नाशिप्र संचालित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान अंतर्गत विविध विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महावि‌द्यालयाच्या प्राचार्य प्रतिभा हिरे होत्या. विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. एस. एस. सांगळे यांनी केले प्रास्ताविकात कार्यशाळेचा हेतू, मुलींमध्ये स्वसंरक्षणआणि आरोग्याबाबत जाणीव जागृती बाबत […]

ज्ञानोत्सव विद्यार्थी परिषदेत आयसीएमए नाशिक चॅप्टरच्या विद्यार्थ्यांचे यश

इगतपुरीनामा न्यूज – २२ ते २४ जानेवारीला इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अकांऊटन्टस ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागातर्फे ज्ञानोत्सव विद्यार्थी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी परिषदेचे नियोजन गुजरात येथील बडोदा चॅप्टरतर्फे करण्यात आले. या परिषदेत पश्चिम विभागातील गोवा, छत्तीसगढ, मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्रातील पुणे, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई व नाशिक चॅप्टर तर्फे ७०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. […]

इगतपुरी तालुक्यात आरटीईंतर्गत १५८ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश : प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यात आरटीईअंतर्गत खाजगी विना अनुदानित स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार तालुक्यातील सुमारे १६ शाळांमध्ये १५८ विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेशाची संधी असून, पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. या मुदतीत अर्ज दाखल करण्याचे आवाहन इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी केले आहे. […]

प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंप्री सदो जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलनाचा रंगारंग कार्यक्रम आयोजित करण्यात आला. देशभक्ती गीतांवर नृत्य, बेटी बचाओ बेटी पढाओसह उपक्रमांनी प्रेक्षकांना भावूक केले. विद्यार्थ्यांनी विविध विषयावर कार्यक्रम सादर केले. यावेळी केंद्रप्रमुख संजय बोरसे, उपसरपंच शहनाज शेख, फिरोज शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अमजद पटेल, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बबलू उबाळे, शाळा व्यवस्थापन समिती […]

error: Content is protected !!