प्रत्येक राजकीय पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची संख्या चिंताजनक : ग्रामपंचायतीतील ‘पडेल’ व्यक्ती सांभाळताहेत प्रचाराची धुरा

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा मतदारसंघात आमदार होण्यासाठी बरेच लोक गुढघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. प्रत्येक राजकीय पक्षांकडे इच्छुक उमेदवारांची संख्या रोजच वाढते आहे. युती आणि आघाडीधर्म पालन न करता प्रत्येकजण आपणच ह्या मतदारसंघांचे तारणहार आहोत असा आविर्भाव दाखवत आहे. पण ज्या मतदार राजाच्या भरवश्यावर हे सगळं चाललंय त्या मतदारांसाठी नेमकं काय करणार आहोत? याचा […]

बाळासाहेब झोले, तुम्ही आमदार नक्कीच व्हाल..! : नवदुर्गा लाडक्या बहिणींकडून शुभेच्छारुपी आशीर्वाद

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र युवा नेते बाळासाहेब उर्फ जयप्रकाश झोले हे अजित पवार गटाकडून इच्छुक उमेदवार असून तालुक्यात त्यांच्या नावाचा बोलबाला सुरू आहे. दोन्ही तालुक्यात त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा रंगत आहे. त्यांच्या उमेदवारीचे दिंडोरी, पेठ, देवळाली, मनमाड, नांदगाव मतदार संघाच्या त्यांच्या लाडक्या बहिणींनी […]

बाळासाहेब झोले यांना इगतपुरी विधानसभेसाठी उमेदवारी देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी

इगतपुरीनामा न्यूज – आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता इगतपुरी तालुक्यात इच्छुकांनी आतापासूनच मतदार संघामध्ये दौरे सुरू केले आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवाराला संधी द्यावी अशी मागणी वरिष्ठांकडे केलेली दिसत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार शिवराम झोले यांचे ज्येष्ठ चिरंजीव बाळासाहेब झोले यांना विधानसभेसाठी उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी होत […]

मदन कडू यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नांदगाव सदो गटप्रमुखपदी सार्थ निवड : इगतपुरी तालुक्यातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव

इगतपुरीनामा न्यूज – तळोघ, ता. इगतपुरी येथील मदन किसन कडू यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या नांदगाव सदो जिल्हा परिषद गटप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके, नाशिक जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, माजी आमदार शिवराम झोले, इगतपुरी तालुकाध्यक्ष पांडुरंग वारुंगसे आदींच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने […]

इगतपुरी तालुक्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करू नये : ..तर तालुक्यात सांगली पॅटर्न राबवणार ; शेकडो कार्यकर्त्यांचा एकच सुर

प्रभाकर आवारी : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असुन यापुढेही तो बालेकिल्लाच राहणार आहे. मात्र इगतपुरी तालुक्यात काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांकडून हस्तक्षेप केला जात आहे. मागील गेल्या मोदी लाटेमध्ये नाशिक जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये केवळ इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघांमध्ये फक्त काँग्रेसचा आमदार निवडून आला. त्या अनुषंगाने इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेमध्ये सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या […]

सडेतोड – विकास का भकास ? इगतपुरीला पाहिजे दमदार अन पाणीदार आमदार

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – धरणे असूनही दरवर्षीची तीव्र पाणीटंचाई, वैतरणा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवण्याचा लढा, सिंचनासाठी पाणी, स्थानिक कामगारांना रोजगार, ग्रामीण भागातील रस्त्यांचे न सुटलेले प्रश्न, उच्चशिक्षणाच्या सुविधा आदी महत्वाच्या विषयावर यंदाची इगतपुरी विधानसभा निवडणूक होणे अपेक्षित आहे. असे असतांना या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी लोकांना भलत्याच विषयांवर भरकटवले जात असल्याचे दिसून येते […]

डॉ. शरद तळपाडे – इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचे व्हिजन असणारे उच्चशिक्षित व्यक्तिमत्व

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर हे दोन्ही आदिवासीबहुल तालुके मिळून विधानसभा मतदारसंघ आहे. सूक्ष्मपणे अभ्यास केल्यावर दोन्हीही तालुक्यातील अनेक मूलभूत समस्या सर्वांसमोर आ वासून उभ्या आहेत. ह्या मतदारसंघातील स्थानिक कुशल तरुणांना हक्काचा रोजगार नाही, आदिवासी वाड्या वस्त्यासह विविध गावांतील खड्डेमय रस्ते वर्षानुवर्षे जैसे थे आहे. दुर्दैवाने ह्या दोन्हीही तालुक्याची ओळख समस्यांचे […]

इगतपुरी तालुक्यातील ‘या’ शिलेदारांनी जिल्ह्यातील अन्य जि. प. गटातुन मिळवली होती विजयश्री

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला काही काळातच सुरुवात होणार आहे. सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी करून उमेदवारी मिळवण्यासाठी जोर लावला आहे. यातच स्थानिक आणि बाहेरचे उमेदवार हा विषय जास्तच पसरत चालला आहे. इगतपुरी तालुक्याच्या इतिहासात मतदारसंघाच्या बाहेर जाऊन विजयी होणारे व्यक्ती आहेत तर तालुक्यातील आपला मूळ जिल्हा परिषद गट सोडून अन्य […]

पूर्वतयारी आमदारकीची – कोण आहेत इच्छुक उमेदवार ? कोणाला मिळेल उमेदवारी ? कसे असेल निवडणुकीचे चित्र ?

भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज – काही अपवाद वगळता सातत्याने इंदिरा काँग्रेसच्या उमेदवाराच्या गळ्यात आमदारकी देणारा इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघ आहे. राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे महाविकास आघाडीतील इंदिरा काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षांतील प्रबळ इच्छुक उमेदवारही तिकिटासाठी प्रयत्न करायला लागले आहेत. ही जागा इंदिरा काँग्रेसची असल्याने विद्यमान आमदार हिरामण खोसकर […]

इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर नाना पटोले यांच्यावर का संतापले ?

इगतपुरीनामा न्यूज – राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीमधून उभा राहिलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांचा परभव झाला. मतदान करताना काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय या आमदारांवर पक्ष श्रेष्ठींकडून कारवाई होणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले होते. या आमदारांमध्ये काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांचे […]

error: Content is protected !!