गोंदे दुमाला येथे राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने करिअर मार्गदर्शन शिबीर आणि गुणगौरव सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४

गोंदे दुमाला येथे राजयोग प्रतिष्ठानच्या वतीने वाडीवऱ्हे जिल्हा परिषद गटातील सर्व विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन शिबीर व गुणगौरव सोहळा गोंदे दुमाला येथे संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी  खचून न जाता अपयशाची भीती मनातून काढावी. यश हे सहजासहजी मिळत नाही. रक्ताचे पाणी करुन ते मिळत असते शहरी भागात शैक्षणिक सुविधा असतात. ग्रामीण भागात सुविधा नसूनही दहावी बारावीत मुलींनी बाजी मारली आहे. त्यांचे मिळालेले यश हे प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन सुभाष जाधव यांनी केले. गोंदे दुमाला येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व राजयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा मनविसे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते, विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे यांनी दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यासाठी करिअर मार्गदर्शन शिबीर व गुणगौरव सोहळा आयोजित केला होता. यावेळी मार्गदर्शन करताना सुभाष जाधव बोलत होते. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, जिल्हा संघटक भगीरथ मराडे, जिल्हा संघटक अभिजित कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, भूषण पागेरे, संजय सहाणे, पत्रकार भास्कर सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. वाडीवऱ्हे  येथील विद्यार्थिनी श्रद्धा गवते हिला यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

जीवनात व्हायचे असेल तर कठीण मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही. अधिकारी व्हायचे स्वप्न असेल तर स्पर्धा परीक्षाद्वारे आपल्या आई वडिलांचे नाव उंचवावे असे स्वप्निल देवरे व डॉ. रोहीत भोईर यांनी मनोगतात सांगितले. हजार ध्येय मनात ठेवण्यापेक्षा एकच ध्येय हजारवेळा ठेवा आणि यश मिळवुन भविष्य घडवा असे भूषण पागेरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमावेळी भाऊसाहेब शेलार, डॉ. प्रशांत मुर्तडक, उपसरपंच रतन शिंदे, संदीप नाठे, गोकुळ धोगडे, सागर नाठे, अंकुश क्षीरसागर, नंदू गायकर, संतोष भाडमुखे, गोकुळ राव, निवृत्ती पाटील, विक्रम डावरे, समाधान वारुंगसे, योगेश जाधव, लक्ष्मण मालुंजकर, वैभव दातीर, विष्णू मुठे, ईश्वर गवते, समाधान मते, यश ठोके, वैभव मुंडे, किरण बोंबले, सुरेश मालुंजकर, आकाश मालुंजकर, गणेश झोमान, सुमित जाधव यांच्यासह परिसरातील विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. आत्माराम मते यांनी आभार तर सुत्रसंचालन गणेश मुसळे यांनी केले. दरवर्षी आम्ही गुणवंत मुलांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते. तालुक्यात मुलांनी मिळवलेल्या यशामुळे आई वडिलांचे नाव उंचावले आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या कार्यक्रमात दीडशे मुलांनी सहभाग नोंदवला असे आत्माराम मते यांनी सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!