वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याकडून होणार सायबर गुन्हे, वाहतुक जागरूकता, महिला सुरक्षा, करिअर मार्गदर्शन उपक्रम : गुरुपोर्णिमेनिमित्त पोलीस ठाण्यातर्फे शिक्षक कृतज्ञता सोहळा संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतुन गुरुपोर्णिमेनिमित्त वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यातर्फे विविध शाळा, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, अधिक्षक, पर्यवेक्षक यांचा पुष्पगुच्छ देवुन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. सत्कार कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग जाधव, महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी कंखरे उपस्थित होते. विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधिक्षक यांच्या संकल्पनेतुन १२ जुलैपासून पासुन वाडीवऱ्हे पोलीस ठाणे हद्धीतील शाळा, महाविद्यालय, आश्रमशाळा यामध्ये सायबर गुन्हे, वाहतुक समस्या नियमन व जागरूकता, महिला सुरक्षा, स्पर्धा परिक्षा करिअर मार्गदर्शन इत्यादी विषयांवर विद्यार्थ्यांना प्रबोधनपर मार्गदर्शन करण्याचा मानस आहे. सदर मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीसाठी उपयोगी पडुन तरूण पिढीमध्ये, किशोरवयीन मुला मुलींमध्ये ऐनवेळी विपरीत परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यासाठी मदत होण्याचा उद्धेश या संकल्पनेतुन साकार होणार आहे. यासाठी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यातर्फे ह‌द्दीतील सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये ह्या विषयामध्ये पारंगत असलेले अनुभवी पोलीस अधिकारी, महिला पोलीस अधिकारी यांची निवड करून विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे असे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी यावेळी सांगितले. सुजाण आणि सुसंस्कृत पिढी घडवण्यासाठी पोलिसांच्या चांगल्या उपक्रमांना पाठबळ उभे करू असा शब्द उपस्थित गुरुजणांनी यावेळी दिला.

error: Content is protected !!