इगतपुरीनामा न्यूज – फेब्रुवारी २०२३ मध्ये राज्य शासनाच्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या ( दि. २५ ) जाहीर होणार आहे.
परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर याबाबतचे प्रकटन जाहीर करण्यात आले असून त्यात उद्या दुपारी दोन वाजेनंतर विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेत स्थळावर निकाल पाहता येईल, असे म्हटले आहे.
दरम्यान बारावी नंतरच्या उच्च शिक्षण अभ्यास क्रमांच्या प्रवेशासाठी बारावीचा निकाल महत्त्वपूर्ण असतो, या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि महाविद्यालये या सर्वांचेच लक्ष निकालाकडे लागून आहे. उद्या दुपारी दोन वाजेनंतर खालील संकेस्थळावर जावून विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
hsc.mahresults.org.in