इगतपुरीनामा न्यूज दि. १ : राज्यात उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महात्मा गांधी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे परीक्षा केंद्र नियोजन बैठक संपन्न झाली. विद्यालयाचे उपप्राचार्य तथा परीक्षा केंद्र संचालक उमाकांत वाकलकर हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
इगतपुरी शहरात दोन परीक्षा केंद्र कार्यान्वित आहेत. दोन्ही परीक्षा केंद्र मिळून जवळपास एक हजारांहून जास्त विद्यार्थी यंदा एसएससी परीक्षेला सामोरे जात आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण येवू नये या दृष्टीने तणावमुक्त वातावरणात परीक्षेचे नियोजन करण्यात आल्याचे केंद्र संचालक उमाकांत वाकलकर यांनी यावेळी सांगितले. तणावमुक्त वातावरणासोबतच कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणीही काटेकोर केली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेदरम्यान कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
महात्मा गांधी हायस्कूल, संजीवनी माध्यमिक आश्रमशाळा, न्यू इंग्लिश स्कूल तळेगाव आणि न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव सदो आदी शाळांचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह उपकेंद्रसंचालक धनंजय सोनवणे, सहपरिरक्षक विजय सोनवणे, पर्यवेक्षक लक्ष्मीकांत ठाकरे, प्रसाद चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
एसएससी परीक्षा मार्च २०२३ चे वेळापत्रक ऑनलाईन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://drive.google.com/file/d/1P6al6Pb2d21IAbNeVZrCoIbLl9FEVNk_/view