ब्रेकिंग न्यूज : दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

इगतपुरीनामा न्यूज – मार्च २०२३ मध्ये राज्य शासनाच्या माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या शालांत (दहावी) परीक्षेचा निकाल उद्या ( दि. ०२ ) जाहीर होणार आहे.

परीक्षा मंडळाच्या अधिकृत संकेत स्थळावर याबाबतचे प्रकटन जाहीर करण्यात आले असून त्यात उद्या दुपारी एक वाजेनंतर विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेत स्थळावर निकाल पाहता येईल, असे म्हटले आहे.

दरम्यान दहावी नंतरच्या उच्च शिक्षण पूर्व टप्प्यामध्ये अकरावी प्रवेश महत्त्वाचा असतो. करिअरची दिशा ठरवण्यासाठी दहावीचा निकाल महत्त्वपूर्ण मानला जातो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि शाळा या सर्वांचेच लक्ष निकालाकडे लागून आहे. उद्या दुपारी एक वाजेनंतर खालील संकेस्थळावर जावून विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात.
https://mahresult.nic.in

error: Content is protected !!