इगतपुरी तालुक्यात “स्वराज्य पक्ष” ठरणार सक्षम पर्याय : तालुकाध्यक्ष नारायण भोसले, युवा तालुकाध्यक्ष गोकुळ धोंगडे यांचा विश्वास

इगतपुरीनामा न्यूज – राजकारणाचा घोडेबाजार, बंडखोऱ्या सामान्य जनता पाहत असून लोक अधिकच संभ्रमात आहे. सदेवजन राजकारणाकडे गलिच्छ नजरेने बघत आहे. एकमेव पारदर्शक स्वच्छ व इतिहासाची जोड असलेला जनतेचा पारदर्शक पक्ष सध्यातरी स्वराज्य हाच आहे. त्यामुळे जनता पुन्हा स्वराज्य उदयास आणणार आहे. तरुण आता संघटित झाला असून जाणकार लोकांसह इतर संघटनांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र वाचविण्याची गरज […]

संभाजी भिडे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादा पवार गटातर्फे इगतपुरीत धरणे आंदोलन करून पोलिसांना निवेदन

इगतपुरीनामा न्यूज – मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी अजितदादा पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार शिवराम झोले व कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरी पोलीस ठाण्यात आंदोलन करण्यात आले. विकृत भाष्य करणारे मनोहर उर्फ संभाजी भिडे या विकृत प्रवृतीच्या व्यक्तीने देशाचे थोर महान व्यक्तीमत्त्व महात्मा गांधी, महात्मा जोतिबा […]

गोरख बोडके यांची राष्ट्रवादीच्या कार्यकारी जिल्हाध्यक्ष पदावर निवड : सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्षपद इगतपुरी तालुक्याला लाभले दुसऱ्यांदा : – उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी दिले नियुक्तीपत्र

इगतपुरीनामा न्यूज – उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, कॅबिनेट मंत्री ना. छगनराव भुजबळ यांनी माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाशिकचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष म्हणून सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडील. या माध्यमातून मी सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी कार्य करण्यावर भर देणार आहे. पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीकडून सोपवलेली जबाबदारी जनकल्याण आणि पक्षबांधणीसाठी उपयोगी ठरेल असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन कार्यकारी जिल्हाध्यक्ष […]

कॅबिनेट मंत्री ना. छगन भुजबळ यांचे इगतपुरीत अभूतपूर्व स्वागत : ना. भुजबळ यांची इगतपुरी तालुक्यावर भक्कम पकड असल्याचे सिद्ध

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. छगन भुजबळ यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. इगतपुरी येथील हॉटेल ग्रीन लँड येथे हजारो कार्यकर्त्यांनी फटाके आणि आतिषबाजी करीत भर पावसाठी जोरदार स्वागत केले आहे. भाजप व शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मंत्री ना. छगन भुजबळ  नाशिककडे जातांना इगतपुरीला थांबले होते. यावेळी जिल्हा […]

लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलचा संपूर्ण १८ जागा विजयी करण्याचा निर्धार : कावनई येथे मतदारांचा मेळावा आणि प्रचाराचा झाला प्रारंभ

इगतपुरीनामा न्यूज – लोकनेते स्व. गोपाळराव ( दादासाहेब ) गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलतर्फे नाशिक जिल्ह्यात महत्वपूर्ण असणाऱ्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत संपूर्ण १८ जागा विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला. स्व. गोपाळराव गुळवे यांच्या स्वप्नातील शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी पॅनलचे सर्व उमेदवार बांधील आहेत. बाजार समितीच्या मतदारांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी हे पॅनल वचनबद्ध असून […]

घोटी कृऊबा निवडणुक – काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट आणि भाजपाची झाली युती : २१ एप्रिलला उमेदवार निश्चित करून होणार कार्यकर्त्यांचा मेळावा

इगतपुरीनामा न्यूज – घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली आहे. या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज खेड भैरव येथील महत्वपूर्ण बैठकीत युतीचा निर्णय घेतला. सिद्ध भैरवनाथ मंदिरात ह्यावेळी सर्वांनी एकत्र राहण्यासाठी शपथ घेतली. इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, शिवसेना […]

घोटी बाजार समितीच्या १८ जागांसाठी वैध ठरलेल्या उमेदवारांची पहा नावांसह यादी : २० एप्रिलपर्यंत माघारीनंतर होईल एकूण पॅनलचे चित्र स्पष्ट

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ –  ( सूचना – ह्या संपूर्ण बातमीची कॉपी केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल. ) नाशिक जिल्ह्यात मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकिची छाननी पार पडली. वैध उमेदवरांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांनी प्रसिद्ध केली आहे. सहकारी संस्थेचा मतदार संघ गटातुन ७ […]

दशरथ धांडे यांची पोलीस पाटील काँग्रेस संघटन तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्रात दुरुस्ती : काँग्रेस तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांच्याकडून दुरुस्त नियुक्तीपत्र प्रसिद्ध

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५ – इगतपुरी तालुका काँग्रेस कमिटी अंतर्गत पोलीस पाटील काँग्रेस संघटन तालुका उपाध्यक्षपदी दशरथ रामकृष्ण धांडे यांची नियुक्ती केल्याचे दुरुस्तीपत्रक इंदिरा काँग्रेसचे इगतपुरी तालुकाध्यक्ष रमेश जाधव यांनी काढले आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या आदेशानुसार यापूर्वी तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्तीचे पत्र रद्द करण्यात आले आहे. मुद्रणदोषामुळे तालुका उपाध्यक्ष पदावर निवड झाल्याच्या […]

त्र्यंबक तालुक्यातील विविध दिग्गज पदाधिकाऱ्यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश : त्र्यंबक तालुक्यातील राजकारणाला मिळणार कलाटणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ – त्र्यंबकेश्वर तालुक्यातील इंदिरा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विविध महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राजकारण यामुळे ढवळून निघाले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ह्या पक्षांतरामुळे गणिते बदलली जाणार आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असल्याचे रवींद्र भोये, मिथुन राऊत यांनी […]

कुऱ्हेगावचे उपसरपंच जयराम गव्हाणे यांना नाशिकजवळ मारहाण : इंदिरानगर पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल

इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ – इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयराम गेणू गव्हाणे यांना नाशिक जवळ पांडवलेणी भागात मारहाण झाली आहे. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमाराला कुऱ्हेगावच्या दिशेने जात असताना अचानक आलेल्या तिघांनी मारहाण केल्याची फिर्याद इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मारहाणीनंतर संशयित व्यक्ती पळून गेले. या घटनेत फिर्यादी जयराम गव्हाणे हे जखमी झाले […]

error: Content is protected !!