स्वराज्यच्या बालेकिल्ल्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न : जिल्हाप्रमुख डॉ. रुपेश नाठे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीराजेंच्या दौऱ्याचे नियोजन

इगतपुरीनामा न्यूज – छत्रपती संभाजी राजे यांच्या नाशिक जिल्हा दौऱ्याबाबत स्वराज्य पक्षाची नाशिक जिल्हास्तरीय महत्त्वपूर्ण प्रमुख पदाधिकाऱ्यांची नियोजन आढावा बैठक संपन्न झाली. प्रास्ताविकात उमेश शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करून बैठकीबद्धल मार्गदर्शन केले. स्वराज्य प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात मर्द मावळे, बहुजन समाज, अठरापगड जातीतील वंचित, कष्टकरी, दिनदुबळ्या, श्रमजीवी यांच्या अथक परिश्रमातून स्वराज्य […]

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत उद्या इगतपुरीत बैठक : सर्व राजकीय पक्षांनी हजर राहण्याचे तहसीलदारांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – भारत निवणूक आयोगाच्या १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी शुध्दीकरण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्या सुधारीत कार्यक्रमानुसार प्रारुप मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२३ ह्या दिवशी प्रसिध्द होणार आहे. त्याअन्वये प्रारुप मतदार यादीसाठी ९ डिसेंबर पर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहे. […]

राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी गोरख बोडके ; ना. भुजबळ यांनी दिले नियुक्तीपत्र : एकाचवेळी भूषवणार प्रदेश सरचिटणीस आणि कार्यकारी जिल्हाध्यक्ष पद

इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी जिल्हाध्यक्षपदावरील नुकतीच सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गोरख बोडके यांना प्रदेश पातळीवर काम करण्याची सुवर्णसंधी दिली आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गोरख बोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदावर आज निवड करण्यात आली. यासोबतच […]

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश संघटक सचिवपदी उमेश खातळे यांची निवड

इगतपुरीनामा न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी इगतपुरी तालुकाध्यक्ष व राष्ट्रवादीचे विद्यार्थी काँग्रेसपासून ते युवक काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केलेले उमेश खातळे यांच्या कार्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश सचिव संघटकपदी त्यांची निवड केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र दिले आहे. यावेळी मेहबूब शेख उपस्थित होते. उमेश खातळे […]

आ. सत्यजीत तांबे यांच्या २०० दिवसांच्या कामाचा ‘रिझल्ट’ जाहीर : सर्वेक्षणात २० हजारांहून अधिक लोकांचा सहभाग : लोकांच्या सुचनांमुळे नवीन काम व सुधारणा करायला ऊर्जा मिळते

इगतपुरीनामा न्यूज – निवडणुकीदरम्यान मतदारांना भेटण्यासाठी चपला झिजवणारे लोकप्रतिनिधी त्यानंतर पुढील पाच वर्ष अजिबात दिसत नसल्याची खंत अनेकदा व्यक्त होते. पण नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे दुसऱ्यांदा आपल्या कामगिरीचं प्रगतीपुस्तक घेऊन जनतेसमोर आले आहेत. आ. तांबे यांनी २०० दिवसांचं सर्वेक्षण घेत जनतेला आपल्या कामाचं मूल्यमापन करायला सांगितलं होतं. आताही ते ऑनलाइन माध्यमातून लोकांसमोर गेले […]

जन्म दाखला ठरतोय “आधार” मध्ये अडसर! : भटका समाज आणि आदिवासी विद्यार्थी शाळाबाह्य होण्याचा धोका

इगतपुरीनामा न्यूज : आधार कार्ड धोरणांमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या बदलांमुळे आता नवीन आधार कार्ड नोंदणी करण्यासाठी जन्म दाखला पुरावा जोडणे बंधनकारक आहे. जन्म दाखल्याशिवाय अन्य कुठलाही पुरावा यासाठी ग्राह्य मानला जात नाही. यापूर्वी जन्म दाखला नसला तरी केवळ रहिवासी दाखला आणि इतर कागदपत्रांच्या आधारे सुध्दा नवीन आधार कार्ड नोंदणी करणे शक्य होते, मात्र या वर्षी […]

स्वराज्य संघटनेच्या मार्फत सामान्य जनतेची कामे करणार : मा.खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे प्रतिपादन! येवला – लासलगाव मतदारसंघातील पहिल्या ‘स्वराज्य’ शाखेचे गोंदेगांवमध्ये उद्घाटन.

निफाड :चंद्रकांत जगदाळे “छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असलेल्या सुराज्यासाठी स्वराज्यची स्थापना केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे खोळंबलेली सामान्य जनतेची कामे मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन स्वराज्य संघटनेचे संस्थापक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज माजी खा. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. येवला – लासलगाव मतदार संघातील पहिल्या स्वराज्य शाखेच्या फलकाचे अनावरण त्यांनी गोंदेगाव (ता.निफाड) येथे […]

घोटीत मनसेची इगतपुरी विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक संपन्न

इगतपुरीनामा न्यूज – मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील मतदारांनी आम्हाला भरघोस मतदान केले आहे. शहरात पक्ष वाढवणे सोपे आहे मात्र ग्रामीण भागात पक्ष वाढवणे कठीण असते. मात्र इगतपुरी तालुक्यातील मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप किर्वे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चांगले काम केल्यामुळे इगतपुरी मतदार संघात मनसेला सर्वात जास्त मतदान झाल्याचे दिसून येते. हाच आनंद घेऊन […]

त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक संपन्न : पत्रकार ज्ञानेश्वर महाले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश : किरण चौधरी यांची त्र्यंबकेश्वर शहराध्यक्षपदी निवड

इगतपुरीनामा न्यूज – कामाचा माणूस, हक्काचा माणुस असलेले उपमुख्यमंत्री ना. अजित पवार ओळखले जातात. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचा सर्वागिण विकास करण्यासाठी राष्ट्रवादीचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हा कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत गोरख बोडके बोलत होते. यावेळी माजी आमदार शिवराम झोले, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष […]

त्र्यंबकेश्वर शहरातील विविध कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

इगतपुरीनामा न्यूज – त्र्यंबकेश्वर शहरातील विविध कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती धरीत पक्षप्रवेश केला. उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगनराव भुजबळ यांच्या कार्यपद्धतीद्वारे विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हा कार्यकारी जिल्हाध्यक्ष गोरख बोडके, त्र्यंबकेश्वरचे तालुकाध्यक्ष बहिरू मुळाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश कार्यक्रम पार […]

error: Content is protected !!