
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा चिटणीस माजी आमदार शिवराम झोले यांचे सुपुत्र युवा नेते बाळासाहेब उर्फ जयप्रकाश झोले हे अजित पवार गटाकडून इच्छुक उमेदवार असून तालुक्यात त्यांच्या नावाचा बोलबाला सुरू आहे. दोन्ही तालुक्यात त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा रंगत आहे. त्यांच्या उमेदवारीचे दिंडोरी, पेठ, देवळाली, मनमाड, नांदगाव मतदार संघाच्या त्यांच्या लाडक्या बहिणींनी अभिनंदन करीत आशीर्वादरूपी शुभेच्छा दिल्या. नवरात्रीच्या पर्वावर नवदुर्गांकडून आशीर्वाद मिळाला हे माझे परमभाग्य असल्याचे श्री. झोले यांनी सांगितले. दिंडोरी पेठ मतदार संघाच्या इच्छुक उमेदवार तथा शरद पवार गटाच्या कार्यकारी अध्यक्षा माजी जिल्हा परिषद सदस्य सुशिलाताई शिवाजी चारोस्कर, इगतपुरी महिला तालुकाध्यक्ष शैलाताई कुंदे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष शरद पवार गट वर्षा पवार, नांदगाव तालुका जिल्हाध्यक्ष संगीता अरुण पाटील, शिवसेना उबाठा गट देवळाली मतदार संघाच्या इच्छुक उमेदवार रेखाताई रावणगावकर ( डोंगरे ) आदींनी आनंद व्यक्त करीत भरभरून शुभेच्छा दिल्या.