इगतपुरीनामा न्यूज – अगदी तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सध्या वातावरण तापले आहे. इगतपुरी मतदारसंघात मात्र अजूनही उमेदवारांबाबत फक्त आखाडे बांधले जात आहेत. अनेक इच्छूक असून यामुळे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांना स्पर्धा दिसत आहे. अशातच काँग्रेस तर्फे इच्छूक वैभव ठाकूर यांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू केल्याने ते आदिवासी नाहीत अशी चर्चा इगतपुरी मतदारसंघात चर्चा सुरू झाली. यावर वैभव ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत मौन सोडत विरोधकांवर पलटवार केला. त्यांनी म्हटले की मी आदिवासीच, यावेळी त्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाण पत्र आणि हायकोर्टाच्या आदेशाची नक्कल सादर केली. वैभव ठाकूर यांनी सांगितले की मी कोणालाही दोष देणार नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, मात्र आरोप करण्याआधी एकदा शब्दभर विचारले असते तर मी सर्व पुरावे दिले असते. मी इगतपुरी शहरातील पंढरपूरवाडी येथील मतदार आहे. २००९ पासून मी प्रभागात मतदान करत आहे. आता बहुधा माझ्या उमेदवारी मागण्यामुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वैभव यांनी सर्वांना आवाहन केले आहे की ज्याला शंका आहे त्यांनी मला भेटावे. आपण आपल्या बांधवांच्या विकासासाठी एकत्र मिळून काम करूयात. मी राजकारणात नवा असलो तरी समाजकारण आणि कामे कशी करून घ्यावी, विकास व रोजगार कसा आणावा हे मला माहित आहे. याच जोरावर मी मते मागणार आहे. गेल्या १५ ते २० वर्षात सत्तेत असणाऱ्यांनी किती विकास केला हे सर्वश्रुत आहे. मी विकासासाठी लढतोय, समोरच्यांना मुद्दे नसल्याने असा प्रचार केला जातोय. मी आणि बाकी सर्व यामध्ये मैत्रपूर्ण लढत सुरू झाली आहे. या मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा असा झाला की आता निवडणूक उमेदवार सुद्धा रोजगार मेळावा घेताय, विविध योजनांची माहिती सामान्य जनतेला देताय. यात फायदा मतदार संघाचा होणार आहे .इतक्या दिवस सर्व शांतच होत कमीत कमी मी जे व्हिजन घेऊन तरुणांना ऑनलाईन रोजगार, विविध योजनांची माहिती, कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करतोय ते बघून का होईना सुरवात तर झाली विकासाची आणि हेच मला हवं आहे. यावेळी वैभव ठाकूर यांचे वडील व आजोबा उपस्थित होते. वैभव यांच्या आजोबांनी १९५० व १९७७ मध्ये ठाकर व ठाकूर समाजाच्या जात प्रमाणपत्रासाठी आंदोलने केली असल्याची माहिती दिली. पत्रकार परिषद पहा.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group