निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
उभाडे ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत रिक्त झालेल्या जागेवर सचिन सुरुडे ह्यांच्या रूपाने तरुण चेहऱ्याला संधी मिळाली आहे. ग्रामपंचायत सदस्य रमेश सुरुडे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली होती. विरोधी गटाकडून पूर्वाश्रमीचे विरोधक सुरेश भोर, सत्ताधारी गटाकडून मयत सुरुडेंचा मुलगा सचिन सुरुडे यांस उमेदवारी दिली होती. निवडणुकीत सुरेश भोर यांना १५३ तर सचिन सुरुडे यांना १९१ मते मिळाली.
सचिन सुरुडेंच्या विजयानंतर ग्रामस्थांना मयत रमेश सुरुडेंच्या आठवणीत अश्रू अनावर झाले. ह्यावेळी सरपंच संतोष पदमेरे, किसन पदमेरे, लक्ष्मण पदमेरे, लक्ष्मण गोंदके, जगन उंबरे, योगेश सुरुडे, निवृत्ती अमृता सुरुडे, चंदनसिंग परदेशी, पंढरी शिंदे, भीमराज माळी, मारुती डोळस, काळू जाखेरे, जयराम पदमेरे, विजय परदेशी, समाधान पदमेरे, भरत पदमेरे, भगवान शिंदे, बहिरु पदमेरे, राजू पदमेरे, त्र्यंबक गोलवड, नंदू गोलवड आदींनी जल्लोष व्यक्त केला. तानाजी सुरुडे, कुंडलीक सुरुडे, अशोक सुरुडे, बंडू सुरुडे, रघुनाथ सुरुडे, मनोहर सुरुडे यांनी अभिनंदन केले आहे.