हरसुल ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत पांडुरंग टोपले यांची बिनविरोध निवड

इगतपुरीनामा न्युज, दि. 10

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या हरसुल ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक 5 मधील पोटनिवडणुकीत सेवानिवृत्त शिक्षक पांडुरंग टोपले यांची बिनविरोध निवड झाली. तत्कालीन अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत वार्ड क्रमांक 5 मध्ये अनिल बोरसे यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाली होती. मात्र अनिल बोरसे हे शिक्षक म्हणून सारस्ते येथील जिल्हा परिषद शाळेत रुजू झाल्याने त्यांनी आपला ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे वार्ड क्रमांक 5 ची जागा रिक्त असल्याने निवडणुक आयोगाच्या नियमानुसार निवडणुक घेण्यात आली.

यासाठी वार्ड क्रमांक 5 च्या एकमेव रिक्त जागेसाठी पांडुरंग टोपले ( सर ) यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी गोविंद चव्हाण यांनी पांडुरंग टोपले यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. यावेळी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष संपतनाना सकाळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर, युवा नेते मिथुन भाऊ राऊत, हरसुलच्या सरपंच सविता गावित, उपसरपंच राहुल शार्दुल, हिरामण गावित, जेष्ठ नेते वामन खरपडे, योगेश आहेर, गोकुळ बत्तासे, शिवसेना हरसुल गणप्रमुख विठ्ठल पवार, महादेवनगरचे सरपंच विष्णु बेंडकोळी, दत्ता व्यवहारे, शकील पठाण, परशराम मोंढे, प्रदीप माळेकर, युवासेना उपतालुकाप्रमुख रघुनाथ गांगोडे, सोपान दुसाने, अजित सकाळे आदींनी शाल श्रीफळ देऊन नवनिर्वाचित सदस्य टोपले यांचा सत्कार करुन अभिनंदन केले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!