इगतपुरीनामा न्यूज, दि. १७
त्र्यंबकेश्वर तालुक्याचा विकास व्हावा, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीचे निवेदन त्र्यंबकेश्वर तालुका शिवसेनेचे समन्वयक समाधान बोडके पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना शिवसैनिकांनी दिले. यावेळी टायगर व्हॅली ॲग्रो अँड ईको टुरिझम रिसॉर्ट, अंबोली डॅम, वेळुंजे ( त्र्यंबकेश्वर ) येथे सेंद्रिय शेती करणाऱ्या संजय गुणाजी बोडके या शेतकऱ्याचा सन्मान नामदार दादासाहेब भुसे यांनी केला. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत आणि तालुक्यातील प्रलंबित कामांबाबत चर्चा करण्यात आली. कृषी विभागाने आदीवासी भागातील शेतकऱ्यांना परांपरागत शेतीच्या व्यतिरीक्त वनौषधी शेती तसेच अधिक उत्पन्न व बाजारभाव मिळेल. पिकेल ते विकेल, शेतकरी समृद्ध कसा होईल याबाबत शेतकरी बांधवांना अधिक मार्गदर्शन करून शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा सुचना दादासाहेब भुसे यांनी कृषी विभागाला दिल्या. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सोसायट्यांच्या निवडणूकांमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी झाले पाहिजे याकरिता शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी जोरदार तयारी करावी असे आवाहनही ना. भूसे यांनी केले.
याप्रसंगी त्र्यंबकेश्वर शिवसेनेचे समन्वयक समाधान बोडके पाटील, माजी पंचायत समिती सभापती देवराम भस्मे, माजी पंचायत समिती सदस्य देवीदास जाधव, तालुका प्रमुख संपतराव चव्हाण, उपतालुकाप्रमुख प्रमुख संजय मेढे, वाघेरा गणप्रमुख अशोक उघडे, सरपंच गोपाळा उघडे, गौतम उघडे, उपसरपंच राजू बोडके, आंबोली सोसायटीचे चेअरमन शिवाजी पाटील मेढे, व्हा. चेअरमन ॲड. कृष्णा बोडके पाटील, सरपंच पांडुरंग लचके, बुधा शेवरे, बाळू बोडके, भावडू बोडके, वाळू उघडे, इंजि. दीपक खातळे, रामदास भगत, पोलीस पाटील ज्ञानेश्वर मेढे, युवानेते योगेश मेढे, भोरू पारधी, दिनकर मेढे, आदींसह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.