घोटी कृऊबा – ग्रा. पं. सदस्य संघर्ष समिती आणि वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत ठरलं : आम्ही आमचं मतदान देणार फक्त “यांनाच”…!

इगतपुरीनामा न्यूज – सर्वसामान्य शेतकरी, वंचित, गोरगरिबांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी व न्याय हक्कासाठी परखड नेतृत्व करणाऱ्या  लोकनेते स्व.गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलला आमचा जाहीर पाठींबा आहे. पॅनलच्या १८ सक्षम उमेदवारांना कपबशी निशाणीवर ठसा देऊन प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विक्रम जगताप, ग्रामपंचायत सदस्य संघर्ष समितीचे योगेश भरीत यांनी केले आहे. […]

शेतकरी विकास पॅनलच्या झंजावाताला पिंपळगाव मोरचे माजी चेअरमन पंढरीनाथ काळे यांचा पाठिंबा

इगतपुरीनामा न्यूज – घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेतकऱ्यांच्या विकासासाठी लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनेलला सर्व क्षेत्रातून पाठिंबा लाभत आहे. ह्या पॅनलचे चिन्ह कपबशी असून ह्या चिन्हावर फुलीचा ठसा मारून सर्व १८ उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहन पिंपळगाव मोर विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन पंढरीनाथ काळे ह्यांनी केले आहे. […]

शेतकरी, कष्टकरी, वंचित आणि मजूरांच्या हितासाठी शेतकरी विकास पॅनलला निवडून द्या : एल्गार कष्टकरी संघटनेतर्फे भगवान मधे यांचा पॅनलला पाठिंबा घोषित

इगतपुरीनामा न्यूज – घोटी बाजार समिती शेतकऱ्यांची आहेच पण कष्टकरी, आदिवासी, वंचित, गोरगरीब, मजूर आणि शेतीशी संबंधित सामान्य माणसाची सुद्धा आहे. ह्या संस्थेवर लोकांच्या प्रश्नांची उत्तम जाण असणारे संचालक पाठवणे आवश्यक आहेत. लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलमध्ये असलेले सर्व उमेदवार यासाठी सुयोग्य आहेत. म्हणून एल्गार कष्टकरी संघटनेचा संस्थापक ह्या नात्याने शेतकरी विकास […]

लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना विजयी करा : शेवगेडांगचे माजी सरपंच साहेबराव उत्तेकर यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या शेतकरी विकास पॅनेलच्या १८ उमेदवारांना बाजार समितीच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन शेवगेडांगचे माजी सरपंच साहेबराव उत्तेकर यांनी केले आहे. शेवगेडांग, म्हसुरली, सांजेगाव, सांजेगाव, आवळी, कुशेगाव, मोडाळे, शिरसाठे, वैतरणा, धारगाव आणि तालुकाभरात त्यांनी मतदारांची भेट घेत आवाहन केले. २८ एप्रिलला होणाऱ्या बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी […]

माजी जि. प. सदस्य कावजी ठाकरे यांनी दिला शेतकरी विकास पॅनलला पाठिंबा : कपबशी निशाणीवर ठसा मारण्याचे केले आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – २८ एप्रिलला घोटी बाजार समितीची सार्वत्रिक निवडणूक होत असून  ह्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या १८ उमेदवारांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करील असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे यांनी केले आहे. कावजी ठाकरे यांचे इगतपुरी तालुक्यातील विविध भागात प्राबल्य असून त्यांनी शेतकरी विकास पॅनलला पाठिंबा घोषित केला आहे. लोकनेते स्व. गोपाळराव […]

वंचित बहुजन आघाडीकडून शेतकरी विकास पॅनलला सक्रिय पाठिंबा जाहीर : पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पॅनलचे १८ उमेदवार विजयी करण्याचा निर्धार

इगतपुरीनामा न्यूज – शेतकरी विकास पॅनलच्या सर्व १८ उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने आपला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे इगतपुरी तालुकाध्यक्ष विक्रम जगताप, महासचिव मिलिंद शिंदे, पक्षनिरीक्षक जितेश शार्दूल, गोंदे दुमालाचे सरपंच शरद सोनवणे, डॉ. आर. वाय. गाडे, नंदुभाऊ पगारे, भूषण पंडित, मिलिंद जगताप, मधुकर बागुल आदींच्या बैठकीत स्व. लोकनेते गोपाळराव गुळवे प्रणित […]

शेतकऱ्यांच्या विश्वासातील १८ संचालक बाजार समितीमध्ये पाठवा – शिवाजी शिरसाठ : लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी विकास पॅनलचा वेगवान प्रचार

इगतपुरीनामा न्यूज – बळीराजा हा देशाचा कणा आहे. त्याच्या प्रश्नांसाठी सदैव कटिबद्ध राहीन त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नसल्याचे लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी पॅनलचे सोसायटी गटाचे उमेदवार शिवाजी शिरसाठ यांनी सांगितले. शेतकरी पॅनेलचा जोरदार झंजावात प्रचार आघाडीवर सुरू आहे. लोकनेते गोपाळराव गुळवे यांनी शेतकरी हितासाठी केलेले काम प्रेरणादायी आहे. त्यांच्या  विचारांचा वारसा […]

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या घोटी बाजार समितीवर शेतकरी विकास पॅनलच्या १८ उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या : खरेदी विक्री संघाचे माजी व्हॉइस चेअरमन हरिश्चंद्र नाठे यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – बळीराजाचे जिव्हाळ्याचे प्रश्न, समस्या, अवकाळी पावसाच्या संकट आणि सुखदुःखात सहभागी कायमच सोबत राहणारे १८ उमेदवार घोटी बाजार समिती निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलतर्फे उमेदवारी करीत आहेत. लोकनेते स्व. गोपाळरावजी गुळवे यांच्या प्रगल्भ विचारांचा वारसा ह्या सर्व उमेदवारांना लाभला आहे. काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, कचरू […]

आगरी सेनेकडून शेतकरी विकास पॅनलच्या १८ उमेदवारांना सक्रिय पाठिंबा : सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आगरी सेना प्रत्यक्ष काम करण्यास कटीबद्ध – संपत डावखर

इगतपुरीनामा न्यूज – शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार आणि नेते हे बाजार समिती आणि इगतपुरी तालुक्याच्या हितासाठी सातत्याने कार्यरत असतात. अशा सर्व व्यक्तींच्या पाठीशी उभे राहून सामान्य शेतकरी आणि लोकांचा विकास साधने अत्यावश्यक असते. आगरी सेना नेहमीच विकासाची कास धरणाऱ्या विचारांवर काम करीत असते. म्हणून नाशिक जिल्हा आगरी सेनेने लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे प्रणित शेतकरी […]

घोटी मर्चंट बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करावेत : खादी ग्रामोद्योगचे व्हॉइस चेअरमन अनिल भोपे यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज – अनेक बँका मोडकळीस आल्या असताना घोटी मर्चंट बँकेचा कारभार उत्तम चालला असून बँकेचे नाव जिल्हाभरात आहे. त्यामुळे घोटी मर्चंट बँक आदर्श आहे. या बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे वाटते. निवडणुकीसाठी लागणारा खर्च वाचवून सभासदांच्या हितासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन खादी ग्रामोद्योगचे व्हॉइस चेअरमन अनिल भोपे यांनी केले आहे. […]

error: Content is protected !!