राष्ट्रवादी नेते छगनराव भुजबळ यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्यावे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्ह्यातील ७ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आणण्यात राष्ट्रवादीचे नेते छगनराव भुजबळ यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्वाने महायुतीसाठी भक्कम अशी मदत झाली. यासह श्री. भुजबळ हे अत्यंत अनुभवी आणि विकासपुरुष म्हणून ओळखले जातात. नाशिक त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा जागतिक पातळीवर त्यांच्यामुळेच यशस्वी होऊ शकला. नाशिक जिल्ह्याच्या विकासात अत्यंत मोठे योगदान छगनराव भुजबळ यांचे असल्याचे कोणीही नाकारू शकणार नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगनराव भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री पद मिळणे अत्यावश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांची छगनराव भुजबळ हे पालकमंत्री व्हावे अशी इच्छा आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष ना. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि महायुतीने छगनराव भुजबळ यांना पालकमंत्री पद द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी केली आहे. 

नाशिक जिल्हा आणि संपूर्ण राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगनराव भुजबळ हे अतिशय अभ्यासू म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात ७ जागी पक्षाने विजय संपादन केला आहे. श्री. भुजबळ यांच्यामुळे जिल्ह्यात खऱ्या अर्थाने विकासाचे पर्व निर्माण झालेले आहे. नाशिकचा विकास, कुंभमेळ्याची यशस्वीता आणि जनमाणसांत असलेळा दांडगा संपर्क यापुढेही विकासाची गंगा आणणार आहे. म्हणून छगनराव भुजबळ यांच्याकडे नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा देणे महत्वाचे आहे. त्यांना पालकमंत्री करावे अशी जिल्ह्यातील सर्वांची भावना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने याची दखल घेऊन छगनराव भुजबळ यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी केली आहे.

Similar Posts

error: Content is protected !!