वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
कोरोना महामारीच्या संकट काळात तालुक्यातील अनेक कोरोना योद्धांनी सामाजिक बांधिलकी जोपासुन गरजुंना सर्वतोपरी मदत केली. यात आरोग्यसेवा, धान्य वाटप आदी मदत कार्य केले तर अनेकांनी आदिवासी वाडया वस्त्या दत्तक घेऊन सामाजिकता जोपासत मानवधर्म व राष्ट्रप्रेम कायम ठेवले. अशा कोरोना योद्धांचा सन्मान म्हणुन प्रग्या फिल्मस् पब्लिकेशनच्या वतीने इगतपुरी येथील हॉटेल मिस्टीक व्हॅली येथील ब्लुव्हेल हॉलमध्ये बॉलीवुड सिने अभिनेत्री दीपाली सैयद भोसले यांच्या हस्ते पुरस्कार देऊन कोरोना योध्दांचा व सामाजिक सेवकांचा सत्कार सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजक तथा प्रग्या फिल्मस् चे निर्माता र्निदेशक पोपट गवांदे व सहनिर्माता तथा गीतकार राजेंद्र नेटावटे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले क्रेडाई संस्थेचे अध्यक्ष उमेश वानखेडे, प्रमुख पाहुण्या सिने अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले व आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते कोरोना योध्दांथा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी नगरपरिषदेने इगतपुरीला पर्यटनस्थळ जाहीर केल्याने पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष नईम खान यांनी इगतपुरी शहर व परिसराचे चलचित्रण एलईडीद्वारे प्रसिद्ध करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस निरीक्षक वसंत पथवे, पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे, मुख्याधिकारी पंकज गोसावी, बिल्डर असोचे संचालक मनोज नानकाणी, व्यापारी संघाचे योगेश मालपाणी, हॉटेल पर्यटनचे मार्गदर्शक मोहम्मद अली शेख, पी. के. ग्रुपचे संस्थापक प्रशांत कडु, नगरसेवक दिनेश कोळेकर, प्रग्या फिल्मस् कायदे विषयी सल्लागार अँड. निलेश चांदवडकर, सीए तौसिफ गलेरीया, पत्रकार सुमित बोधक, संदिप कोतकर, शैलेश पुरोहित, राजु देवळेकर, गणेश घाटकर यांचाही सन्मान करण्यात आला. बॉलीवुड अँकर ओंकारेश्वरी यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रग्या फिल्मस् चे सह निर्माता गीतकार राजेंद्र नेटावटे यांनी केली तर प्रग्या फिल्मस् चे निर्माता पोपट गवांदे यांनी मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार व्यक्त केले
यावेळी कोरोना योध्दा पुरस्कार्थी तहसीलदार परमेश्वर कासुळे, तत्कालीन तहसीलदार अर्चना भाकड, तत्कालीन मुख्याधिकारी निर्मला गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, तालीम संघाचे संस्थापक ज्ञानेश्वर लहाने, मनसे जिल्हा उपाध्याक्ष संदिप किर्वे, कपिलधारा पॉलीटेक्नीकचे संचालक कुलदिप चौधरी, उपनगराध्यक्ष नईम खान, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, सरकारी वकील अँड. रेश्मा जाधव, ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षका डॉ. स्वरुपा देवरे, प्रभुनयन फाऊंडेशन अध्यक्ष आनंद मवानी, उपसरपंच भाऊराव भागडे, नर्मदा हॉटेलचे संचालक अनिल गभाले, मुख्याध्यापक अनिल शिरसाठ, डॉ. सचिन मुथा, आदर्श पत्रकार वाल्मीक गवांदे, विकास काजळे यांचा सन्मान करण्यात आला.
कोरोना काळात ज्या योध्दांनी सामाजिकता व मानवता जोपासली अशा दातृत्वाला खरे 'देवदुत' म्हटले पाहीजे. यांना समाजातील गरजुंची सेवा करण्याचे भाग्य लाभले. त्यांना स्फुर्ती मिळावी म्हणून प्रग्या फिल्मस् चा प्रयत्न स्तुत्य आणि मोलाचा आहे.
- दीपाली सय्यद भोसले, सिने अभिनेत्री