कोविड काळात विधवा झालेल्या महिलांसाठी ‘वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना’ : ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय जारी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २ कोरोना जागतिक महामारीच्या कालावधीत घरातील कर्ता पुरूष मृत्यूमुखी पडल्याने विधवा झालेल्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांना सन्मानजनक उपजीविका करता यावी, यासाठी ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन अशा महिलांसाठी वीरभ्रदकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून आज या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य […]

कोरोना लसीकरणाशिवाय महाविद्यालयात प्रवेश नसल्याने विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घ्यावे : प्राचार्य डॉ. भाबड ; केपीजी महाविद्यालयात कोविड लसीकरण शिबिर संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. २९ कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इगतपुरी, विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने व इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या सहकार्याने मिशन युवा स्वास्थ्य अभियानांतर्गत महाविद्यालयात कोव्हिड -१९ लसीकरण   शिबिर संपन्न झाले. मिशन युवा स्वास्थ्य लसीकरण मोहीम, महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण विभाग व सावित्रीबाई फुले […]

हरसूल महाविद्यालयात कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन

सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. २६ त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत सतर्क राहून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोतीराम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हरसुल येथील कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कोविड-19 लसीकरण शिबिर संपन्न झाले. महाविद्यालयात आयोजित आठवडाभराच्या या लसीकरण शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोतीराम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्व विघार्थ्यांनी न […]

महात्मा गांधी हायस्कूल येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण

इगतपुरीनामा न्यूज दि. २२ : इगतपुरी येथील महात्मा गांधी हायस्कूल आणि कॉलेज व नूतन मराठी शाळा येथे कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. सिरम इन्स्टिट्यूट पुणे, केळकर हॉस्पिटल नाशिक आणि रा. स्व. संघ जनकल्याण समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी शहरातील अल्प उत्पन्न धारक सर्वसामान्य नागरिकांसाठी कोविशिल्ड या कोराना प्रतिबंधक मोफत लसीचे लसीकरण यावेळी करण्यात […]

कोरोना लसीकरणाच्या दोन डोस मधील अंतर कमीत कमी दिवसांचे करावे : खासदार हेमंत गोडसे यांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना साकडे

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२ केंद्र सरकारने नुकतेच राज्यशासन आणि आरोग्य प्रशासनाच्या सहकार्याने देशातील १०० कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा पूर्ण केल्याने आज खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. आज मितीस दोन डोस मधील अंतर 84 दिवसांच्या असल्याने देशवासियांना विविध अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता लसींची उपलब्धता वाढली असून […]

कोरोना लसीच्या दुष्परिणामामुळे इगतपुरीच्या महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्याचा ‘एईएफआय’ समितीचा अहवाल : इगतपुरीसह जिल्हाभरात चर्चेला उधाण

 इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ जानेवारीमध्ये घेतलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे इगतपुरी येथील महिला डॉक्टरचा मृत्यू झाल्याचे निदान झाले आहे. डॉ. स्नेहल दिलीप लुणावत ( वय 32 ) असे महिला डॉक्टरचे नाव असून ‘एईएफआय’ समितीच्या अहवालानुसार लसीमुळे घटना घडल्याचव नमूद आहे. ह्या घटनेमुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. लसीचा डोस घेतल्यानंतर तिला त्रास सुरू झाला. लो मायग्रेनचा […]

कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी लॉयन फाउंडेशनतर्फे घोटीत लसीकरणाला उदंड प्रतिसाद : संदीप किर्वे, निलेश जोशी, विकास जाधव आदींच्या साहाय्याने ८५८ जणांचे विक्रमी लसीकरण

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ कोरोना महामारी आजारापासून हमखास बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करणे अत्यावश्यक आहे. यासह लसीकरण केल्याने राष्ट्रीय कार्याला हातभार लागतो. यामुळे आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे संक्रमणापासून संरक्षण होते. या पार्श्वभूमीवर कोरोना विरुद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी घोटी येथील लॉयन फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. काननवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने घोटी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण […]

कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना मदत देण्यासाठी जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितींची स्थापना – अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांची माहिती

इगतपुरीनामा न्यूज, दि. १४ सर्वोच्च न्यायालयाने कोविड-19 ने मरण पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य आपत्कालीन प्रतिसाद निधीतून 50 हजार रुपये मदत निधी देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी व्हावी आणि काही तक्रारींचे निराकरण करण्यासाठी राज्य शासनाने तक्रार निवारण समितींची स्थापना केली आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. […]

पाचवीपासून शाळा सुरू, मात्र ग्रामीण भागातील चौथीपर्यंत शाळा अजूनही बंदच! सरसकट शाळा सुरू करण्याची मागणी

इगतपुरीनामा न्यूज दि. ५ : कोविडमुळे बंद असलेल्या शाळांमध्ये काल तब्बल दीड वर्षानंतर शाळेची घंटा वाजली आणि विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजून गेल्याचे चित्र काल पाहायला मिळाले. राज्य शासनाच्या आदेशाने काल राज्यभरात शाळा सुरू झाल्या. ग्रामीण भागातील शाळांमध्ये पाचवी पासून पुढचे वर्ग तर शहरी भागातील शाळांमध्ये आठवी पासून पुढचे वर्ग सुरू झाले आहेत. शाळा सुरू झाल्या […]

सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ४ गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रौत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दि. ७ ते १५ ऑक्टोबर २०२१ दरम्यान नवरात्र / दुर्गापूजा /दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, अजूनही कोरोनाचा धोका […]

error: Content is protected !!