अतिदुर्गम ग्रामीण भागात लसीकरणाचा ओघ वाढला : काळूस्ते आरोग्य केंद्रामार्फत एकाच दिवशी ६३० नागरिकांचे लसीकरण

निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

इगतपुरी तालुक्यातील अति दुर्गम डोंगरी भागात नागरिकांचा ओघ कोरोना प्रतिबंधक लसीकरणाकडे वाढला असून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज प्राथमिक आरोग्य केंद्र काळूस्ते अंतर्गत खैरगाव उपकेंद्रातील खैरगाव, शेणवड बुद्रुक, पेहरेवाडी आदी वाड्यांमध्ये लसीकरण सत्र पार पडले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार प्राथमिक आरोग्य केंद्र काळूस्तेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश काळे, डॉ. सोनाली कोळी, आरोग्य सहाय्यक रमेश आवारी व सटन लॉड्रीक यांनी यशस्वी लसीकरण सत्र पार पाडले.

नियोजनबद्ध पद्धतीने 4 ठिकाणी झालेल्या सत्रात ग्रामपंचायत खैरगाव व शेणवड बुद्रुक येथे ६३० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. या ठिकाणी नाव नोंदणी, टोकन वाटप, रजिस्ट्रेशन व तपासण्या करण्यात आल्या. यावेळी निखिल चित्ते, नितीन बडगुजर, मीरा कहांडळ, एस. एल. कुंदे, भावना गायकवाड, उत्तम घोरपडे, सागर दिंडे, प्रदीप बच्छाव, रवी पाटील, संतोष लेकुळे, महेश गावित, मीना तोकडे, इंदूबाई फोडसे, राठोड आदी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. ग्रामपंचायत सरपंच श्रीमती खडके, उपसरपंच कैलास कडू, अंगणवाडी आशा, कार्यकर्ती, मदतनीस, शिक्षक वृंद खैरगाव व शेणवड ग्रामस्थ यांचेही लसीकरण कार्यक्रमाला सहकार्य लाभले. जुंद्रे दाजी, बंडू काठे यांनी ऑनलाईन कामकाजासाठी मदत केली.

नियोजनबद्ध पद्धतीने आमच्या आरोग्य केंद्रामार्फत अव्वल काम करून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सत्र पार पाडले. दुर्गम भागात नागरिकांनी लसीकरण कार्यक्रमाकडे पाठ फिरवू नये म्हणून आम्ही केलेले सामूहिक प्रयत्न खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरते. आमच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांचे स्वतःहून लस घ्यायला पुढे येणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.

- रमेश आवारी, आरोग्य सहाय्यक काळूस्ते

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!