
इगतपुरीनामा न्यूज दि. २२ : इगतपुरी येथील महात्मा गांधी हायस्कूल आणि कॉलेज व नूतन मराठी शाळा येथे कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. सिरम इन्स्टिट्यूट पुणे, केळकर हॉस्पिटल नाशिक आणि रा. स्व. संघ जनकल्याण समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने इगतपुरी शहरातील अल्प उत्पन्न धारक सर्वसामान्य नागरिकांसाठी कोविशिल्ड या कोराना प्रतिबंधक मोफत लसीचे लसीकरण यावेळी करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार परमेश्वर कासुळे आणि नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज गोसावी यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि महात्मा गांधी हायस्कूलच्या शालेय समितीचे अध्यक्ष हेमंत सुराणा आणि नूतन मराठी शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष अशोकशेठ नावंदर यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वरूपा देवरे तसेच इगतपुरी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नईम खान हे उपस्थित होते. महात्मा गांधी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अनिल पवार, मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका शांता तुसे, कला-वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य नितीन वासन, कार्यकारी मंडळाचे सदस्य अविनाश कुलकर्णी, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष शैलेश पुरोहित, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा वासंती दाणी, अशोका मेडीकव्हरचे कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी महात्मा गांधी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, नूतन मराठी शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.