
सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथे विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत सतर्क राहून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोतीराम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हरसुल येथील कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात कोविड-19 लसीकरण शिबिर संपन्न झाले. महाविद्यालयात आयोजित आठवडाभराच्या या लसीकरण शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोतीराम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या सर्व विघार्थ्यांनी न घाबरता, मनात काही शंका न बाळगता कोविड लसीकरण करून स्वतः सोबत आपल्या घराला सुरक्षित करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
लसीकरण शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ठाणापाडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार नवाळे, आरोग्य सहाय्यक आरिफ मन्सूरी, आरोग्य सहाय्यक युवराज दळवी, आरोग्य सेविका वैशाली भोये, गट प्रवर्तक पद्मा महाले आदी प्रयत्नशील आहेत. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी या वेळी लसीकरण करून घेतले. १८ वर्षावरील एकही विद्यार्थी लसीपासून वंचित राहू नये यासाठी २६ ते ३० ऑक्टोबरपर्यंत शिबिर सुरू आहे. शिबीराच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना,मुक्त विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना प्रयत्नशील आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंडवधरे यांनी तर आभार डॉ. पी. जे. बोरसे यांनी मानले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एम. पी. पगार, क्रीडा शिक्षक प्रा. सुहास वराडे, आर. टी. शिंदे, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.