कोरोना लसीकरणाच्या दोन डोस मधील अंतर कमीत कमी दिवसांचे करावे : खासदार हेमंत गोडसे यांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना साकडे

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

केंद्र सरकारने नुकतेच राज्यशासन आणि आरोग्य प्रशासनाच्या सहकार्याने देशातील १०० कोटी नागरिकांच्या लसीकरणाचा टप्पा पूर्ण केल्याने आज खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. आज मितीस दोन डोस मधील अंतर 84 दिवसांच्या असल्याने देशवासियांना विविध अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता लसींची उपलब्धता वाढली असून दोन डोस मधील अंतर कमीत कमी दिवसांचे करावे आणि लवकरच शाळा सुरू होणार असल्याने मुलांच्या लसीकरणाची मोहीम गतिमान करावी असे साकडे खासदार हेमंत गोडसे यांनी नामदार मांडविया यांना घातले आहे.
     
गेल्या वर्षी कोरोनाने देशभरात थैमान घातले होते. प्रारंभी लस उपलब्ध नसल्याने देशातील हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. काही महिन्यांपूर्वी लस उपलब्ध झाल्याने केंद्र आणि राज्य शासनाकडून देशभरात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. केंद्र शासनाने राज्य शासनाच्या मदतीने सर्वत्र जोरदार लसीकरणाची मोहीम राबविल्याने शंभर कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तम नियोजन करून राज्यातील लाखो नागरिकांचे लसीकरण करून घेत त्यांना सुरक्षित केले आहे.
     
या पार्श्वभूमीवर आज खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेत शंभर कोटी नागरिकांचे यशस्वी लसीकरण केल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या. सुरुवातीला लसीची उपलब्धता अल्प असल्याने सरकारने दोन डोस मधील अंतर 85 दिवसांचे ठेवले होते. परिणामी दोन डोस पूर्ण होण्यास मोठा कालावधी लागत असल्याने नागरिकांना विविध परवानग्यासंह अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे देशभरातील नागरिक त्रस्त आहेत. आता देशभरातील सर्वच लसीकरण केंद्रावर लसीची उपलब्धतता मोठ्या प्रमाणावर असल्याने दोन डोस मधील अंतर कमीतकमी दिवसांचे करावे असे साकडे यावेळी खासदार गोडसे यांनी केंद्रीयमंत्री मांडविया यांना घातले आहे. याबरोबरच सर्वत्र लवकरच शाळा सुरू होणार असल्याने लहान मुलांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी अशी आग्रही मागणी खासदार गोडसे यांनी नामदार मांडविया यांच्याकडे केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!