“ओमीक्रॉन”च्या पार्श्वभूमीवर पुन्हा “शाळा बंद”च्या भीतीने धास्तावले विद्यार्थी आणि पालक!

इगतपुरीनामा न्यूज दि. ०४ : दोन वर्षे सुरू असलेला कोरोना संसर्ग अजून तरी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट त्यानंतर कोरोनाचे नवनवीन प्रकार समोर येत असल्याने अजूनही परिस्थिती म्हणावी तितकी स्थिर झालेली नाही. तब्बल दीड वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीच्या खंडानंतर नुकत्याच शाळा नियमित सुरू झालेल्या असतांनाच आता पुन्हा नव्याने आलेल्या ओमिक्रॉन या कोरोना च्या नव्या […]

कळसूबाई मंडळाकडून सर्वोच्च शिखरावर नव्या वर्षाचा सूर्योदय आणि नवीन वर्षाचे स्वागत : कळसूबाईच्या जयजयकाराने शिखर दुमदुमले

इगतपुरीनामा न्यूज, दि. १ घोटीच्या प्रसिद्ध कळसुबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी  सालाबादप्रमाणे नव्या वर्षाच्या पहाटेच महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखराची चढाई केली. नव्या नव्या वर्षातील पहिल्या सूर्योदयाचे पहिले किरण पडताच कळसुबाई मातेचा अभिषेक करून महाआरती करण्यात आली. कोरोना राक्षसाच्या तिसऱ्या लाटेपासून जनतेला वाचव असे साकडे कळसुबाई मातेचरणी गिर्यारोहकांकडून घालण्यात आले. यावेळी मातेचा जयघोष करीत छत्रपती शिवाजी […]

इगतपुरी तालुक्यात कोरोनामुळे १६५ जणांचा आतापर्यंत मृत्यू : मयताच्या वारसाला ५० हजारांच्या सहाय्यासाठी करावा लागणार अर्ज : “अशी” आहे अर्ज करण्याची कार्यपद्धती

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५ कोरोनाचा भयानक काळ मार्च २०१९ ला सुरू झाला. तेव्हापासून १६ नोव्हेंबर २०२१ पर्यंतच्या काळात इगतपुरी तालुक्यात कोरोनामुळे १६५ व्यक्तींचे मृत्यू झाले आहेत. कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या आधार कार्डवरील पत्ता गृहीत धरून त्या त्या तालुक्यात याद्या बनवण्यात आल्या असल्याचे समजते. ‘कोविड-१९’ आजाराने मृत पावलेल्या ह्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास 50 हजार रुपयांच्या सानुग्रह […]

मुंढेगाव आश्रमशाळेतील १५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण : वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सतर्कतेने ३४० व्यक्तींची झाली चाचणी ; प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर सुरू

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ इगतपुरी तालुका कोरोनामुक्त झाला असतानाच मुंढेगाव येथील आदिवासी विकास विभागाचा इंग्रजी माध्यम निवासी आश्रमशाळेतील १५ विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. ह्या शालेय विद्यार्थ्यांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कळवण तालुक्यातील एका विद्यार्थ्याला किरकोळ लक्षणे जाणवत असल्याने त्याची चाचणी घेण्यात आली. यामध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. ह्या […]

नाशिक जिल्ह्यात सुई विरहित कोरोना लसीकरणाचा मार्ग मोकळा : जिल्हा प्रशिक्षण केंद्रात इंडिया फर्स्ट निडल फ्री व्हॅक्सिनचे आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण संपन्न

सुभाष कंकरेज : इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ नाशिक जिल्ह्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण अधिक सुलभतेने आणि १०० टक्के यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंडिया फर्स्ट निडल फ्री व्हॅक्सिन भारतात पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यामध्ये दिले जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशिक्षण केंद्रामध्ये ग्रामीण भागातील आरोग्य सेविकांचे इन्स्ट्रुमेंट हाताळणीचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले. जिल्हा […]

कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकटतम नातेवाईकास सानुग्रह सहाय्याला अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ विकसित

इगतपुरीनामा न्यूज, दि. 1 कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 4 ऑक्टो 2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन ) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी प्रसारित केला आहे. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने Online web portal विकसित […]

निनावी ग्रामस्थांना मोफत पिठाची गिरणी आणि कांडप यंत्र ; लवकरच गरम आणि गार पाणी देणार – सरपंच गणेश टोचे : निनावी इगतपुरी तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत होणार – बीडीओ डॉ. लता गायकवाड

एकनाथ शिंदे : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५ इगतपुरी तालुक्यातील निनावी ग्रामपंचायतीमध्ये पाटोदा गावाप्रमाणे मोफत पिठाची गिरणी, कांडप यंत्र खरेदी करण्यात आली आहे. त्यानुसार ग्रामस्थांना सर्व सेवा मोफत देण्यात येणार आहेत. यासह आगामी काळात शुद्ध थंडगार पाणी, गरम पाणी सुद्धा मोफत देणार असल्याचे लोकनियुक्त सरपंच गणेश टोचे यांनी सांगितले. निनावी येथे कोविड योद्धा सन्मान सोहळा आणि […]

अद्याप लस घेतली नसेल तर मुंढेगाव परिसरात लस उपलब्ध : वंचित नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन

वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राची वाटचाल उद्दीष्ठपूर्तीकडे इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण भागातील मुंढेगाव परिसरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण जोरात सुरू आहे. लसीकरणासाठी ह्या भागातील नागरिक स्वतःहून पुढे येत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून नागरिकांमध्ये आरोग्याच्या प्रबोधनाचे सुद्धा काम केले जात आहे. अद्याप लसीकरण झालेले नाही अशा नागरिकांसाठी लसीचे दोन्ही डोस उपलब्ध असून नागरिकांनी संपर्क साधावा असे […]

लसीकरणासाठी कठोर उपायांऐवजी जनतेच्या पुढाकारासह प्रशासनाला घरोघरी जाण्याचे आवाहन : पालकमंत्री छगन भुजबळ

जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासह ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार इगतपुरीनामा न्यूज, दि. 12 गेल्या दोन महिन्यात हजाराच्या घरात असलेली रूग्णसंख्या नवरात्र, दसरा दिवाळी नंतरही ४०० च्या आसपास स्थिर असून हे चांगले संकेत असून यात जिल्ह्यातील राबवलेल्या लसीकरण मोहिमेचा  मोठा परिणाम आहे. येणाऱ्या काळात जिल्ह्यात संपूर्ण लसीकरणासह ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन क्षमता निर्माण होणार आहे. […]

इगतपुरी तालुका झाला कोरोनामुक्त ; तालुक्यात २ लाख लसीकरण पूर्ण : मिळालेले यश सर्व वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना समर्पित

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ इगतपुरी तालुक्यासाठी आनंदाच्या २ महत्वाच्या बातम्या आहेत. इगतपुरी तालुका संपूर्ण कोरोनामुक्त झाला असून आज अखेर कोरोना बाधितांची संख्या शून्यावर आली आहे. यासह दुसरी आनंदाची बातमी म्हणजे संपूर्ण तालुक्यात आजच २ लाख कोरोना लसीकरणाचे डोस पूर्ण झाले आहेत. यामध्ये ७५ टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. उर्वरित लोकांचे लसीकरण लवकरच पूर्ण […]

error: Content is protected !!