पेहेचान प्रगती फाउंडेशनतर्फे धामडकीवाडी, भगतवाडी शाळेत पर्यावरणपूरक होळी : फुलांची मनसोक्त उधळण आणि विविध सामाजिक उपक्रम संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ बालगोपाळांचा अत्यंत आवडीचा सण म्हणजे होळी..सणाच्या निमित्ताने गोड पदार्थांवर ताव मारून पिचकाऱ्यांमधून एकमेकांवर रंग उडवण्यासाठी बच्चे कंपनी आतुर असते. ह्यामध्येच कोरोना महामारीमुळे होळी सणाचा आनंद अनेकांना घेता आला नाही. महामारीमुळे उत्पन्नावर सुद्धा दूरगामी परिणाम झाल्याने त्याचा फटका होळीच्या उत्साहाला बसला. अशा पार्श्वभूमीवर मुंबई येथील पेहेचान प्रगती फाउंडेशनच्या मदतीने इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी […]

दमदार, कसदार आणि दैदिप्यमान कार्यामुळे गोरख बोडके पुणे येथे कार्यक्षम लोकप्रतिनिधी पुरस्काराने सन्मानित : कोरोनाकाळात हजारो लोकांचे आशीर्वाद लाभले हाच माझा पुरस्कार : गोरख बोडके

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज, दि. ७ कोरोनाचा खडतर काळ…ऑक्सिजनचा जीवघेणा तुटवडा..पेशंटच्या बेडचा अभाव…इंजेक्शन अन प्लाझ्माचे दुखणे… आणि जगण्यासाठी काय करायचे याची भ्रांत…!!! अशा बिकट काळात इगतपुरी तालुक्यासह इतरही भागाला जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्या रूपाने खरा परमेश्वरी देवदूत लाभला. ह्या संकटकाळात जनतेचा कळवळा असल्याचा आव आणणारे लोक […]

जिल्हाधिकारी मांढरे यांच्या कर्तृत्वाला रेखाचित्रातून सलाम : प्रसिद्ध चित्रकार डॉ. राजीव देशमुख यांनी काढले रेखाचित्र

संतोष कथार : इगतपुरीनामा न्यूज, दि. २ जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या कर्तृत्वाला रेखचित्रातून प्रसिद्ध चित्रकार डॉ. राजीव देशमुख यांनी सलाम केला आहे. नाशिकचे जिल्हा अधिकारी सूरज मांढरे यांचे कर्तृत्व संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला ज्ञात असून गेल्या दोन वर्षांत त्यांनी कोवीड १९ कालावधीत केलेले उत्कृष्ट नियोजन व कार्य कौतुकास्पद आहे. सुरज मांढरे यांच्या या कार्याला प्रसिद्ध चित्रकार […]

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाला ग्रामपंचायतींकडून केराची टोपली : ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी प्रोत्साहनपर भत्त्यापासून अद्यापही वंचित

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४ कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर १ हजार रुपये भत्ता अदा करणेबाबत नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जून २०२१ मध्ये निर्णय घेतलेला आहे. याबाबतचा पत्रव्यवहार सर्व पंचायत समित्या आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना करण्यात आलेला आहे. संबंधितांकडून ग्रामपंचायतींना सूचना नसल्याने प्रोत्साहनपर भत्त्याच्या आदेशाला केराची टोपली मिळाली […]

ब्रेकिंग न्यूज : सोमवारपासून शाळा सुरू करण्यास राज्य सरकारची सशर्त परवानगी

इगतपुरीनामा न्यूज दि. २० : जेमतेम काही दिवस सुरू असलेल्या राज्यातील शाळा कोरोना रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागल्याने राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी पुन्हा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आज झालेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत येत्या सोमवार पासून राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली असून स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून […]

उपसरपंच अरुणा जाधव, मनसे शहराध्यक्ष निलेश जोशी यांच्या संयुक्त विद्यमाने घोटीत कोविड लसीकरण आणि नेत्रतपासणी शिबीर संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ घोटी ग्रामपालिकेच्या उपसरपंच अरुणा विकास जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना घोटी शहराध्यक्ष निलेश दत्तात्रय जोशी यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण मोहीम आणि मोफत नेत्रतपासणी शिबीर उत्साहात संपन्न झाले. काननवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने कोविड लसीकरणाला मोठा प्रतिसाद लाभला. रामोळे आय हॉस्पिटलच्या आरोग्य पथकाने नागरिकांची नेत्र तपासणी करून उपचार केले. पुढील वैद्यकीय सेवा […]

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी, वाडीवऱ्हे, घोटी पोलीस ठाणे ॲक्शन मोडवर : कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. ९ राज्यभरात कोरोना संसर्ग पुन्हा जोर धरू लागला आहे. नागरिकही बेभानपणे नियमांची पायमल्ली करीत असल्याने संसर्गाचा धोका वाढत आहे. नाशिकचे पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी कठोर निर्बंधांबाबत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सूचना केल्या आहेत. यासह मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांनीही नुकतेच नव्याने निर्बंध लागू केले आहेत. ह्या पार्श्वभूमीवर इगतपुरी, वाडीवऱ्हे, घोटी हे […]

मुकणेच्या एमपीजी विद्यालयात १३० तर मुंढेगावच्या जय योगेश्वर विद्यालयात ५५ विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ मुकणे येथील महर्षी पुंजाबाबा गोवर्धने विद्यालयात १३० विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला. मुंढेगाव येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयातही 15 ते 18 वर्ष वयोगटातील 55 विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीवऱ्हे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही […]

कोरोना लसीकरणाचा बुस्टर डोस आणि मुलांच्या लसीकरणाच्या डोसचा कालावधी कमी करावा : राष्ट्रवादी माहिती व तंत्रज्ञान सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत निमसे यांची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. ०७ नाशिक जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लसीकरणाचा बूस्टर डोस तात्काळ देण्यात यावा. मुलांच्या दोन डोस मधील लसीकरणाचा कालावधी कमी करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी माहिती व तंत्रज्ञान सेलचे जिल्हाध्यक्ष संकेत निमसे यांची जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात असे म्हटले आहे की, मागील दोन वर्षांपासून कोरोनासारख्या महामारीशी आपण लढत आहोत. असे असताना नाशिक […]

माणिकखांबच्या ज्ञानगंगा विद्यालयातील २०० विद्यार्थी झाले लसवंत

इगतपुरीनामा न्यूज, दि. ६ कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लस देणे सुरू झाले आहे. त्यानुसार माणिकखांब येथील ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यालयाचे २०० विद्यार्थी लसवंत झाले.आरोग्य उपकेंद्र माणिकखांब यांच्यातर्फे हे लसीकरण झाले. कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्वांनी नियमांचे पालन करावे, विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी स्वतःहून […]

error: Content is protected !!