इगतपुरीनामा न्यूज, दि. ६
कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लस देणे सुरू झाले आहे. त्यानुसार माणिकखांब येथील ज्ञानगंगा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यालयाचे २०० विद्यार्थी लसवंत झाले.
आरोग्य उपकेंद्र माणिकखांब यांच्यातर्फे हे लसीकरण झाले. कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सर्वांनी नियमांचे पालन करावे, विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी स्वतःहून पुढे यावे, कुटुंबातील सर्व सदस्यांना लस घेण्यास प्रवृत्त करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुलिका क्षिरसागर यांनी सांगितले. आरोग्य सेवक परशराम चौधरी, मुख्याध्यापक अमोल गवई यांनी लसीकरणाचे व्यवस्थापन चोखपणे केले. यावेळी माणिकखांबच्या सरपंच अंजना चव्हाण, मुख्याध्यापक अमोल गवई, आगरी समाजाचे सचिव भोलेनाथ चव्हाण, शिवसेना शाखाप्रमुख भारत भटाटे, ग्रामपंचायत सदस्य शाम चव्हाण, भाऊसाहेब आहेर, एकनाथ पवार, दिलीप अहिरराव, जयराम नाठे, कैलास मुसळे, दगडु गायकर, सविता कौदरे, नंदा चव्हाण, शारदा चव्हाण आदी उपस्थित होते