उपसरपंच अरुणा जाधव, मनसे शहराध्यक्ष निलेश जोशी यांच्या संयुक्त विद्यमाने घोटीत कोविड लसीकरण आणि नेत्रतपासणी शिबीर संपन्न

इगतपुरीनामा न्यूज, दि. १९

घोटी ग्रामपालिकेच्या उपसरपंच अरुणा विकास जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना घोटी शहराध्यक्ष निलेश दत्तात्रय जोशी यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण मोहीम आणि मोफत नेत्रतपासणी शिबीर उत्साहात संपन्न झाले. काननवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने कोविड लसीकरणाला मोठा प्रतिसाद लाभला. रामोळे आय हॉस्पिटलच्या आरोग्य पथकाने नागरिकांची नेत्र तपासणी करून उपचार केले. पुढील वैद्यकीय सेवा देण्यासाठी आरोग्य पथकाने नागरिकांना मार्गदर्शन केले. घोटी येथील वार्ड क्रमांक 6 मध्ये कोविड लसीकरण मोहीम व भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. याप्रसंगी तब्बल 500 हून अधिक लोकांनी लसीकरणाचा व नेत्रतपासणीचा लाभ घेतला. प्रचितराय महाराज बिल्डिंग मटेरियल व टॅंकर सप्लायर विकासभाऊ जाधव व विशाल वालतुले, किरण गुंजाळ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!