
इगतपुरीनामा न्यूज – अकोले येथील अगस्ति सहकारी साखर कारखानाचा २०२५-२६ चा ‘३२ वा’ बॉयलर अग्नीप्रदिपन व गळीत हंगाम शुभारंभ गुरुवारी ३० ऑक्टोबरला होणार आहे. हा सोहळा सकाळी ९.३० वाजता आमदार किरण लहामटे यांच्या हस्ते आणि चेअरमन सिताराम पाटील गायकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी बंधू भगिनी व हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांनी केले आहे. प्रभारी कार्यकारी संचालक विजय सावंत, परबतराव नाईकवाडी, रामनाथ बापू वाकचौरे, विकासराव शेटे, सुधीर शेळके, बाळासाहेब नाईकवाडी, अशोकराव देशमुख, मच्छिंद्र धुमाळ, मनोज देशमुख, बादशहा बोंबले, सदाशिव साबळे, सुलोचना नवले, सुनिताताई भांगरे, अशोकराव आरोटे, कैलासराव शेळके, विक्रम नवले, सिताराम वाकचौरे, प्रा. विलासराव नवले, शांताबाई वाकचौरे, यमाजी लहामटे, पाटीलबुवा सावंत, प्रदिप हासे, सचिन दराडे संदिपराव शेटे आदी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे.