साक्षात प्रभू श्रीराम स्पर्शांकित रामसेतूचा भाग्यवान दगड इगतपुरीत : आजही काचेच्या भांड्यातील पाण्यात तरंगतोय हा दगड

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाट चढून आल्यावर उजव्या बाजूला पुरातन दक्षिण मुखी हनुमान मंदिर आहे. या मंदिरात रामायण कालीन रामसेतुचा दगड पहावयास मिळतो. अनेक वर्षापूर्वी रामेश्वर वरून आलेल्या एका साधूने येथे एका दिवसासाठी येथे मुक्काम केला होता. येथील मंदिराचे पारंपरिक पुजारी असलेले बैरागी यांचे आजोबा शांताराम चौधरी यांनी त्यांची मनोभावे सेवा केली […]

अयोध्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा – जगदगुरु द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास लहवितकर यांना रामजन्मभूमी न्यासाकडून विशेष निमंत्रण

लक्ष्मण सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साधू, संत, महंत महामंडलेश्वर जगदगुरु आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यात जगद्गुरू द्वाराचार्य म्हणून वारकरी संप्रदायाचे उपासक संत तुकाराम महाराज अध्यासन पुणे विद्यापीठ माजी प्रमुख व प्राध्यापक लेखक महामंडलेश्वर श्री महंत विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर यांना रामजन्मभूमी न्यास […]

इगतपुरी तालुक्यातील ३ ठिकाणे प्रभू श्रीरामाच्या सानिध्याने पावन : “असा” आहे रामायणकालीन पौराणिक इतिहास

नहि तद्भविता राष्ट्रं यत्र न रामो न भूपतिः । तद्वनं भविता राष्ट्रं यत्र रामो निवत्स्यति ॥(- वाल्मिकी रामायण २/३७/२९) ‘श्रीराम जेथे नसेल, ते राष्ट्र राष्ट्रच राहणार नाही आणि जेथे राम असेल तो उजाड प्रदेश, वनवासी भागही राष्ट्र होईल.’ थोर तत्त्वज्ञ, चिंतक, तपस्वी वशिष्ठ ऋषींचे हे वाल्मिकी रामायणातील उदगार आहेत. राष्ट्रपुरुष प्रभू रामचंद्राचे अनन्य महात्म्य सार्थ, […]

श्रीराम मंदिर उदघाटन दिनी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करा – आ. सत्यजीत तांबे : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

इगतपुरीनामा न्यूज – अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या उदघाटन सोहळ्याच्या निमित्ताने उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही सार्वजनिक सुटी जाहीर करावी अशी आग्रही विनंती आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. राज्यातील उत्सवी वातावरण लक्षात घेता रस्त्यांवर मोठ्या संख्येने मिरवणुका निघतील. त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची अडचण होऊ शकेल. नोकरीधंद्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना याचा फटका बसू नसे […]

“एकनाथ” नावाच्या ५१ पेक्षा व्यक्तींच्या सहभागाने मुंढेगावला होणार दिमाखदार हरिनाम सप्ताह : श्री संत एकनाथ महाराज जलसमाधी चतुशतकोत्तर महोत्सवानिमित्त भाविकांना मेजवाणी

एकनाथ शिंदे : इगतपुरीनामा न्यूज – प्रारंभापासून अखेरच्या दिवसांपर्यंत म्हणजेच ७ दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी फक्त “एकनाथ” नावांचेच प्रवचनकार, कीर्तनकार, मृदंगमणी, गायक, टाळकरी, चोपदार, विणेकरी, अन्नदाते असणार आहेत. नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील गतीर बंधू यांनी ह्या जगावेगळ्या हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी पर्यंत होणाऱ्या ह्या सप्ताहात तब्बल ५१ […]

इगतपुरी येथील कानिफनाथ मठात प्रचंड उत्साहात दत्तजयंती साजरी : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामाचा दिवसभर गजर

इगतपुरीनामा न्यूज – गुरुदेव गुरुदत महाराज जन्मोत्सवाच्या मंगलमय पर्वावर महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी इगतपुरी येथील कानिफनाथ महाराज मठात हजेरी लावली. मागील आठवड्यापासून सुरु झालेला सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा दिमाखात संपन्न झाला. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर बाळासाहेब भगत यांच्या यांच्या सुमधुर भक्तीगीतांचा आस्वाद भाविकांना मिळाला. आज सकाळपासून दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..कानिफनाथ महाराज […]

घाटनदेवी मंदिर प्रवेशद्वाराच्या कमानीचे कंटेनरकडून नुकसान

इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावरील पुरातन व जागृत देवस्थान असलेल्या घाटनदेवी मंदिराच्या प्रवेशद्वाराची कमान विहिगावच्या दिशेने पाईप घेऊन जाणाऱ्या कंटेनरने पाडली. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरीही कमान पूर्णपणे क्षतिग्रस्त झाली आहे. विशेष म्हणजे विहिगावला जाण्यासाठी जव्हार फाट्यापासून रस्ता असूनही वेळ व इंधनाची बचत करण्याच्या नादात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असलेल्या […]

श्री गजानन मित्र मंडळाने साकारलेला श्री केदारनाथ देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

इगतपुरीनामा न्यूज – घोटी शहरात नवरात्रौत्सवानिमित्त श्री गजानन मित्र मंडळाने प्रति श्री केदारनाथ मंदिराचा भव्य देखावा साकारला आहे. ही कलाकृती पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी होत असून देखावा पाहण्यासाठी भाविक येत आहेत. दरवर्षी श्री गजानन मंडळाकडुन वेगवेगळे धार्मिक देखावा साकारण्याची परंपरा आहे. घोटीच्या उपसरपंच स्वाती कडु, श्री गजानन मित्र मंडळाचे मार्गदर्शक हिरामण कडु, भाऊसाहेब शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली […]

छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आहुर्ली येथे उत्स्फुर्त स्वागत

नवनाथ गायकर : इगतपुरीनामा न्यूज – नाशिक जिल्हा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांचे वतीने नाशिक जिल्हयात छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचे आहुर्ली येथे आगमन झाले होते. यात्रेचे उत्स्फुर्तपणे जोरदार स्वागत करण्यात आले. आहुर्ली येथे माजी चेअरमन तथा पत्रकार नवनाथ अर्जुन पा. गायकर यांच्यासह शिवसेनेचे शेतकरी सेना […]

गरुडेश्वर येथील संत सद्गुरू श्री स्वामी अक्षय महाराज आश्रमात मनोकामेष्टी यज्ञ

इगतपुरीनामा न्यूज – गरुडेश्वर येथील ओम तपोनिधी प. पू. संत सद्गुरू श्री स्वामी अक्षय महाराज आश्रमात शंभुवाणी ट्रस्टच्या वतीने पोर्णिमेनिमित्त मनोकामेष्टी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. संत सद्गुरू श्री स्वामी अक्षय महाराज यांच्या आशीर्वादाने पार पडलेल्या यज्ञाची पूजा, हवन शिवमंडल महाराज, शिवसागर महाराज, जयराम पुजारी, दीदी माँ यांनी केली. यज्ञ यजमान म्हणूम संपत गुंजाळ आणि […]

error: Content is protected !!