
इगतपुरीनामा न्यूज – मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या इगतपुरी तालुक्यातील आदर्श ग्रामसंसद मोडाळे येथील ८० यात्रेकरू अयोध्येच्या दिशेने आज रवाना झाले. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके यांनी यात्रेकरुंसाठी नाशिकरोड रेल्वे स्थानकापर्यंत बसची सुविधा उपलब्ध करून दिली. परतीच्या प्रवासाला सुद्धा बस दिली जाणार आहे. राज्यात मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु असून राम मंदिर दर्शनासाठी भाविक आजपासून २२ मार्चपर्यंत जाणार आहेत. नाशिकरोड स्थानकातून रेल्वेने अयोध्येच्या दिशेने प्रस्थान केले. मोडाळे येथे प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके आणि मोडाळेच्या सरपंच शिल्पा आहेर यांच्या हस्ते यांच्या हस्ते बसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. राज्य सरकार आणि आमचे गोरखभाऊ बोडके यांच्यामुळे आम्ही आमचं भाग्य समजतो. प्रभू श्रीरामाने आम्हाला दर्शनासाठी बोलवलं आहे. आज आम्ही दर्शनाला जात असल्याचा मोठा आनंद होत आहे, अशा भावना मोडाळेच्या भाविकांनी व्यक्त केल्या
