
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावरील गोंदे दुमाला येथील १९७० ओल्ड प्रभू ढाब्याजवळील प्राचीनकालीन ओंकारेश्वर महादेव मंदिरात आज महाशिवरात्री निमित्त भाविकांची वर्दळ वाढली होती. दरवर्षी लहान थोरांसह आबालवृद्ध भाविकांची मांदियाळी याठिकाणी दाखल होत असते. या मंदिरात सकाळपासूनच भगवान शंकराची यथोचित पूजा आरती करण्यात आली. हे महादेव मंदिर जागृत देवस्थान मानले जाते. या ठिकाणी अनेकांची श्रद्धा असून, प्रत्येकाला धार्मिक कार्याची प्रेरणा यातून मिळत असते. सर्वतीर्थ टाकेद तसेच त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात दूरवर जाण्यापेक्षा भाविक भक्त महाशिवरात्रीच्या निमित्ताने दर्शनासाठी या मंदिरात येतात. ओल्ड प्रभू हॉटेलचे संचालक बंडोपंत लिंबाजी चाटे पाटील हे १९७० पासून दररोज सकाळ सायंकाळी न चुकता नियमितपणे मंदिराची पूजा आरती करतात. मंदिरात अनेकांच्या मनोकामना, आकांक्षा पूर्ण होतात असे ओल्ड प्रभुचे संचालक विलासभाऊ चाटे पाटील नेहमी सांगतात.