खेड भैरव येथील पिण्याचे पाण्याचे दुखणे मिटले ; उपसरपंच खंडेराव जाधव यांच्या प्रयत्नांनी मिळाले यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. 25इगतपुरी तालुक्यातील मोठा विस्तार असलेल्या खेड भैरव गावात गेल्या २५ वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचे दुखणे महिला आणि गावकऱ्यांना भेडसावत होते. यामुळे दरवर्षी पाचवीला पुजलेली पाणीटंचाई सहन करण्यापलीकडे ग्रामस्थ काही करू शकत नव्हते. गावातील कुंभार विहिरीवर जेमतेम पाणी असतांना रात्रीच्या वेळी पुरेसे पाणी मिळवण्याचा प्रयत्न येथील महिला करायच्या. अशा परिस्थितीचे विदारक चित्र पाहून खेड […]

कुणी रुग्णवाहिका देता का? तीस हजार लोकसंख्येसाठी एकच रुग्णवाहीका

इगतपुरीनामा न्यूज (शैलेश पुरोहित) दि. १४ : इगतपुरी नगरपरिषद हद्दीत गेल्या काही दिवसापासून रुग्णवाहिका व शववाहिका मिळत नसल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांसह इतर रुग्णांचे देखील हाल होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. इगतपुरी शहरातील ग्रामीण रूग्णालयात एकमेव रुग्णवाहिका आहे. इगतपुरी शहर व परिसरातील गावांची लोकसंख्या विचारात घेता ३० हजार नागरिकांना सध्या एकाच रुग्ण वाहिकेवर अवलंबून राहवे लागत […]

हायमास्ट आणि भूमिगत गटारींची दुबार कामे ; ग्रामपंचायत सदस्य संघटनेकडून चौकशीची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 6 ( विशाल रोकडे )जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती नवबौध्द घटकांच्या विकासासाठी इगतपुरी तालुक्यात काही ठिकाणी झालेली दुबार कामे ( एकच काम दोनवेळा) आताही मंजुर करण्यात आले आहे. त्यात हायमास्ट, भुमिगत गटारी ही कामे मोठ्या प्रमाणात मंजुर आहेत. ही कामे करत असताना गैरव्यवहार आणि अफरातफर होण्याची दाट शक्यता आहे. ह्या आधीच […]

जनसेवा प्रतिष्ठान कडून निराधार व्यक्तीवर अंत्यसंस्कार

इगतपुरीनामा न्यूज दि. ५ : इगतपुरी शहरातील शिवाजी चौकात एक बेवारस व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. ही व्यक्ती निराधार असल्याने इगतपुरी शहरात गेले काही दिवस वावरत असल्याचे लक्षात आल्यावर ही व्यक्ती काही वर्षांपूर्वी इगतपुरी येथील गुरुद्वारा मध्ये सेवा देत असल्याचे निष्पन्न झाले. निराधार असल्याने या व्यक्तीचे अंत्यसंस्कार कुणी करायचे हा प्रश्न उभा राहिल्याने ‘जनसेवा प्रतिष्ठान’ने या […]

ना कारवाईचा धाक, ना क्वारंटाईनचे गांभीर्य! सुपर स्प्रेडर इगतपुरीच्या मुळावर!

इगतपुरीनामा न्यूज (शैलेश पुरोहित) दि. २ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कमी लक्षणे असणाऱ्या आणि अजिबात लक्षणे नसणाऱ्या बाधितांना घरीच विलगीकरणात राहून औषधोपचार घेण्यास सांगितले आहे. मात्र हेच विलगीकरणात असलेले बाधित शहरातील ‘सुपर स्प्रेडर’ असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. विलगिकरणात असतांनाही या व्यक्ती घराबाहेर पडत असून सर्रास सामान्य जनतेमध्ये […]

2 महिन्यापासून वाघेराचा कोशिम पाडा अंधारातच ;
महावितरणचा भोंगळ कारभार ; अधिकारी नॉट रीचेबल

इगतपुरीनामा न्यूज, दि. २८( सुनिल बोडके यांच्याकडून ) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा ग्रामपंचायत अंतर्गत कोशिम पाडा महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे गेल्या 2 महिन्यापासून अंधारात आहे,वाघेरा येथील ग्रामपंचायतीने वारंवार पत्रव्यवहार करून रोहित्र बदलून देण्याची मागणी केली. मात्र महावितरणचे अधिकारी सुस्त अवस्थेत बसून ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली दाखवत आहे.संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता अधिकारी नॉट रीचेबल असल्याचे […]

रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे इगतपुरीकर खड्ड्यात; सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र झोपेत

इगतपुरीनामा न्यूज दि. १८ : पर्यटनासाठी अनुकूल म्हणून इगतपुरी तालुक्याचे नाव परिचित आहे. मुंबई, ठाणे, नाशिक यांसह विविध राज्यांतून इगतपुरी शहरात पर्यटक येत असतात. मात्र, इगतपुरी शहरातील मुख्य रस्त्याची दुरवस्था पाहून नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे. इगतपुरी शहरातील जुना मुंबई आग्रा मार्ग २०१४ मध्ये समिर भुजबळ यांच्या खासदार निधीतून १४ कोटी रुपये खर्च […]

कृषीपंपाची वीज तोडणी त्वरित थांबवा : इगतपुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. १८ :इगतपुरी तालुक्यातील शेतकरी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संकटातून जात आहेत. अस्मानी आणि सुलतानी संकटासह कोरोनामुले त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. परिणामी थकलेले वीजबिल वसुलीसाठी कृषी पंपांची वीज जोडणी तात्काळ थांबवावी अशी मागणी इगतपुरीच्या प्रहार दिव्यांग संघटनेच्या शिष्टमंडळाने केली आहे. इगतपुरीच्या महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांना प्रहार अपंग क्रांती संस्था प्रणित प्रहार […]

घोटी सिन्नर मार्गावरील सूचना फलकांना मरगळ; दिशादर्शक फलक गायब

इगतपुरीनामा न्यूज दि. १८ : पिंपळगाव मोर : इगतपुरी तालुक्यातून जाणारा महत्वाचा राज्य महामार्ग म्हणून ओळखला जाणारा घोटी सिन्नर मार्गावरील सूचना फलकांना मरगळ आलेली दिसून येते आहे. घोटी बाजारपेठेत कर्नाटक,तामिळनाडू,आंध्रप्रदेश आदी राज्यातून मसाल्याचे पदार्थ व किराणा माल येतो तसेच पुणे, चाकण,औरंगाबाद औद्योगिक वसाहतींसाठी मालवाहू वाहनांची वर्दळ असते.कोल्हार,भंडारदरा मार्ग देखील येथूनच जातो.वाहनांच्या प्रचंड वर्दळ व त्यात […]

इगतपुरी-घोटीत कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची जनसेवा प्रतिष्ठानची मागणी

इगतपुरीनामा न्यूज दि. 14 : इगतपुरी शहरातील ज्येष्ठ नागरिक, कोविडशी सामना करतांना नेहमीच आघाडीवर असलेले फ्रंट लाईन वारीयर्स यांना वेळेत कोरोनाची लस मिळावी यासाठी इगतपुरी व घोटी शहरात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी ‘जनसेवा प्रतिष्ठान’ने निवेदनाद्वारे केली आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना नुकतेच याबाबत निवेदन देण्यात आले.यावेळी ज्येष्ठ नागरिक […]

error: Content is protected !!