घोटी सिन्नर मार्गावरील सूचना फलकांना मरगळ; दिशादर्शक फलक गायब

इगतपुरीनामा न्यूज दि. १८ :


पिंपळगाव मोर : इगतपुरी तालुक्यातून जाणारा महत्वाचा राज्य महामार्ग म्हणून ओळखला जाणारा घोटी सिन्नर मार्गावरील सूचना फलकांना मरगळ आलेली दिसून येते आहे.

घोटी बाजारपेठेत कर्नाटक,तामिळनाडू,आंध्रप्रदेश आदी राज्यातून मसाल्याचे पदार्थ व किराणा माल येतो तसेच पुणे, चाकण,औरंगाबाद औद्योगिक वसाहतींसाठी मालवाहू वाहनांची वर्दळ असते.कोल्हार,भंडारदरा मार्ग देखील येथूनच जातो.वाहनांच्या प्रचंड वर्दळ व त्यात सूचना फलकांची कमतरता यामुळे दैनंदिन अपघात होत आहेत.

सध्या सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाच्या वाहनांची वर्दळ असते. शिर्डीला जाणारे पायी भाविकांची देखील रेलचेल असते.

घोटी-सिन्नर मार्गावर सूचना फलक कुठे पडलेले तर तिथे जीर्ण झालेलं आहेत काही ठिकाणी पुसट झाले असून सूचना समजत नाहीत.

गाव शाळा अपघाती वळणाचे फलक नामशेष
पुढे गाव आहे,पुढे शाळा आहे,अपघाती वळण आहे आदी फलक दिसेनासे झाले असून नवीन वाहन चालकांचा संभ्रम होतो त्यामुळे लहान मोठे अपघात होत आहेत, त्यातून काही मृत्यू तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व देखील येते आहे.

पूर्वीचे गतिरोधक लुप्त
या मार्गावरील डागडुजी व नव्याने झालेल्या काँक्रीटीकरण आदींमुळे पूर्वी गावाजवळ व अपघाती वळणांवर असलेले गतिरोधक लुप्त झाले असून नवीन रस्त्यावर वाहने सुसाट चालत असून गावकऱ्यांना प्रचंड डोकेदुखी झाली आहे.

■साईड पट्ट्या व गटारी कच्च्या
पावसाळ्यात पडणाऱ्या प्रचंड पावसाने मुरूम धुवून गेला आहे तसेच नवीन काँक्रीटीकरणामुळे रस्त्याची उंची वाढली आहे.नवीन रस्ता त्यातच अवजड मालवाहू वाहनांच्या स्पर्धेत व ओव्हरटेक करतांना साईडपट्टीला गाडी उतरून होणारे अपघात घोटी-सिन्नर रस्त्याला नवीन नसल्याने साईडपट्टी मजबूत करण्याची वाहनचालकांची मागणी आहे.

पिंपळगाव मोर : रस्त्यावरील गतिरोधक दर्शवणारे मोडकळीस आलेला फलक. (फोटो : निलेश काळे)

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!