हायमास्ट आणि भूमिगत गटारींची दुबार कामे ; ग्रामपंचायत सदस्य संघटनेकडून चौकशीची मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 6 ( विशाल रोकडे )
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती नवबौध्द घटकांच्या विकासासाठी इगतपुरी तालुक्यात काही ठिकाणी झालेली दुबार कामे ( एकच काम दोनवेळा) आताही मंजुर करण्यात आले आहे. त्यात हायमास्ट, भुमिगत गटारी ही कामे मोठ्या प्रमाणात मंजुर आहेत. ही कामे करत असताना गैरव्यवहार आणि अफरातफर होण्याची दाट शक्यता आहे. ह्या आधीच अनेक ठिकाणी हायमास्टची कामे केलेले असूनही त्यांची  देखभाल योग्य रितीने होत नाही. धक्कादायक म्हणजे पुन्हा त्याच ठिकाणी नवे काम मंजूर करण्यात आले आहे. हा उघड उघड गैरव्यवहार असून दुबार कामांची प्रशासनाने चौकशी करावी. अनु जाती नवबौध्द घटकांना न्याय देवुन संबधितावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य संघर्ष संघटना इगतपुरी तालुका यांच्या वतीने इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन देतेवेळी ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष मच्छिद्र दोंदे, योगेश भरीत, राहुल जगताप, रविंद्र घाटेसाव, अतिश पंडित, प्रभाकर चिकणे, संदिप भंडागे, विजय चंद्रमोरे, प्रकाश पंडित, बबलु उबाळे, अशोक पगारे, मयुर डोळस, आत्माराम उघडे आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!