इगतपुरीनामा न्यूज – सर्वच सैनिक भारत देशाचे रक्षण करण्यासाठी आपले घर आणि कुटुंब सोडतात. जबाबदारीमुळे त्यांना भावा बहिणींचा रक्षाबंधन हा पवित्र सण सैनिकांना साजरा करता येत नाही. रक्षाबंधन सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र सैनिकांना रक्षाबंधनाच्या सणाचा आनंद घेता येत नाही. सणाच्या दिवशी त्याला त्याची बहीण आणि कुटुंबाची खूप आठवण येते. हे […]
इगतपुरीनामा न्यूज – ७८ व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब हिलसिटीचे अध्यक्ष गोरख बोडके यांच्या प्रयत्नातून मोडाळे येथील आठवी ते दहावीच्या सर्व शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार ड्रेसचे वाटप करण्यात आले. ज्ञानदा माध्यमिक विद्यालयात वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सायली दीपक पालखेडकर उपस्थित होत्या. रोटरी क्लब हिलसिटीच्या कार्याचे त्यांनी भरभरून कौतुक केले. ह्या […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे येथील भारत दादा गांगुर्डे यांच्या राहत्या घराला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळाले होते. ह्या घटनेत सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी रोख रक्कम, किराणा साहित्य, कपडे खाक होऊन हे कुटुंब रस्त्यावर आले आहे. रोटरी क्लब हिलसिटीचे अध्यक्ष गोरख बोडके यांना ह्या घटनेची माहिती मिळताच ऐन पावसाळ्यात डोक्यावरचे छप्पर गमावलेल्या […]
इगतपुरीनामा न्यूज – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय दप्तर मिळावे यासाठी रिलायन्स फाउंडेशनने पुढाकार घेऊन वचनपूर्ती केली आहे. इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना आज रिलायन्स फाउंडेशतर्फे दप्तराचे वाटप करण्यात आले. मोडाळेच्या लोकनियुक्त सरपंच शिल्पा आहेर यांच्या हस्ते ‘एक दप्तर मोलाचे’ अंतर्गत दप्तराचे वितरण करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती तुपे, […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील विविध गावांतील शाळांना रोटरी क्लब हिलसिटी इगतपुरीचे अध्यक्ष गोरख बोडके यांच्या प्रयत्नातून मुंबई येथील नवनीत फाउंडेशन व अँटोस प्रयास फाउंडेशनतर्फे दर्जेदार एलईडी टीव्ही आणि इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमाचे ई लर्निंग सॉफ्टवेअर देण्यात आले. ह्या शैक्षणिक साहित्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना सुलभपणाने फायदा होऊन शैक्षणिक प्रगती साधता येणार आहे. […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी रेल्वे स्टेशन येथून बुधवारी डाऊन दुरंतो एक्सप्रेसमध्ये अचानक गरोदर महिलेला असह्य त्रास होऊ लागला. याबाबत माहिती समजताच इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली बापुसाहेब गुहिल, सुजाता निचड, निकिता काळे यांनी माणुसकी दाखवली. यामुळे सुदेशना चेतन साबळे वय ३० वर्ष रा. प्लॉट नं २३ ए कैलास नगर […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी शहरातील सर्व महिलांसाठी महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फार्म भरण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आज इगतपुरी नगर परिषद कार्यालयात पहिल्याच दिवशी शेकडो फार्म जमा करण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी पंकज गोसावी, कार्यालय अधीक्षक रमेश राठोड, कर्मचारी रश्मी ननावरे,असमा पठाण, अमृता बाविस्कर, भारतीय जनता पार्टीचे किरण फलटणकर, वैशाली आडके, योगेश […]
इगतपुरीनामा न्यूज – पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे, पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे, जगात गोड्या पाण्याचे प्रमाण मुळातच फार कमी आहे. स्वत: ला खरोखर किती पाण्याची गरज आहे हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले तर पाण्याची टंचाई कमी करण्यास मदत होईल असा विश्वास अखिल भारतीय दिगंबर जैन महिला परिषद माटुंगा मुंबईच्या अध्यक्षा […]
इगतपुरीनामा न्यूज – पिंप्री सदो येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची १२६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीचे आयोजन बिनधास्त महिला मंडळातर्फे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ग्रामसेवक गुलाब साळवे, पोलीस पाटील रमेश पाटेकर, ग्रामपंचायत सदस्य, बिनधास्त मित्र मंडळाचे आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने […]
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील गावठा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुंबई येथील ऊर्जा ग्रुपकडून विविध कामे पूर्ण करण्यात आली. राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांनी ह्या शाळेत वर्गखोली व व्हरांडा फरशीकाम, नवीन ध्वजस्तंभ, रंगमंच, पाण्याची टाकी, ओटा यांची दुरुस्ती, फरशीकाम, मुलामुलींचे स्वच्छतागृह दुरुस्ती, लाईट फिटिंग दुरुस्ती, नळ फिटिंग दुरुस्ती, खिडक्या वेल्डिंग काम, स्वच्छता गृहाकडे जाणारा […]