जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन ‘सीएमपी’ प्रणालीने करावे : शिक्षक भारतीची मागणी

इगतपुरीनामा न्यूज (विशेष प्रतिनिधी) दि. ९ : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करून दरमहा वेतन सीएमपी प्रणालीद्वारे करण्यात यावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे व शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक वर्षापासून मुख्य प्रश्न प्रलंबित असुन मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदोन्नती बाबत आमदार कपिल पाटील यांनी […]

शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांची इगतपुरी तालुक्यातील विविध शाळांना भेट

इगतपुरीनामा न्यूज दि. १५ : उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आज जिल्ह्यातील शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. आज नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी इगतपुरी तालुक्यातील विविध शाळांना भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशासकीय बाबींची पाहणी करून समाधान व्यक्त केले आणि कामकाज संबंधी सूचना दिल्या. इगतपुरी बीटातील चांदवाडी आणि टिटोली जिल्हा परिषद […]

विद्यार्थ्यांच्या पर्यायी शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक – मागासवर्गीय शिक्षक संघटना

इगतपुरीनामा न्यूज दि. ७ : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या वतीने इगतपुरी पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी राजेश तायडे यांचा आज सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्याबरोबरच कोविड काळात शासन स्तरावरून आदेशाची वाट न पाहता विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण कसे सुरू ठेवता येईल, यासाठी उपाययोजना […]

हार्डवेअर दुकाने बंद : वादळामुळे झालेले नुकसान दुरुस्त करण्यात अडचणी

इगतपुरीनामा (विशेष प्रतिनिधी) दि. १९ : राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे आवश्यक पाऊल असले तरी सामान्य नागरिकांना यामुळे बऱ्याच अडचणी निर्माण होतांना दिसत आहेत. काही गोष्टी या ‘जीवनावश्यक’च्या व्याख्येत बसत नसल्या तरी त्यांच्यावाचून नेहमीच काम अडत असल्याने त्या जीवनावश्यक ठरतातच! हार्डवेअरची सेवा ही सुद्धा त्यातलीच एक आहे. […]

जनसेवा प्रतिष्ठानने केला परिचारीकांचा सन्मान

इगतपुरीनामा न्यूज, दि. १२ : आज परिचारिका (सिस्टर) दिनानिमित्त इगतपुरी ग्रामीण रुग्णालय आणि डेडीकेटेड कोवीड सेंटर येथे आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांना सेवा देणाऱ्या परिचारीका वराडे सिस्टर, शेळके सिस्टर, इंगळे सिस्टर, बागुल सिस्टर, सपना सिस्टर तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वरुपा देवरे, डॉ. पूनम पाटिल, डॉ. शिल्पा थोरात आदींचा जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने […]

दहावीच्या परीक्षा रद्द केल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब

इगतपुरीनामा दि. १२ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा आयोजित करण्यात येते. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी सदर परीक्षा माहे मे २०२१ मध्ये आयोजित करण्याचे प्रस्तावित होते. तथापि, कोविड १९ रोगाच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे राज्य मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा रद्द करण्याची […]

दिलासादायक : ‘कोरोनामुक्त’ची आकडेवारी ‘कोरोनायुक्त’ पेक्षा ठरतेय वरचढ

इगतपुरीनामा न्यूज दि. ५ : इगतपुरी तालुक्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण बऱ्यापैकी वाढतांना दिसत असून कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढत असल्याने दिलासा मिळतांना दिसत आहे. आज तालुक्यात ४५ जणांनी आज एकाच दिवशी कोरोनावर मात केली असून कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार ३८ नव्या संशयीत रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला […]

महाराष्ट्र गौरव गीत

श्रीमती वैशाली भामरेजि. प. शाळा माणकेता. मालेगाव, जि. नाशिकसंपर्क : 7447302081 महाराष्ट्र आपुले आहे महानआम्हास वाटे त्याचा अभिमानधर्म जात संस्कृतीने इथल्याभरलाय नसानसात स्वाभिमान मराठी आमुची बोलीभाषातिचा गोडवा आहे अपरंपारसह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांचीइतिहासात कीर्ती आहे फार कोकण खान्देश विदर्भ मराठवाडामहाराष्ट्राच्या आमुची आहे शानसाहित्य संस्कृती कला क्षेत्रालासाऱ्या देशामध्ये मोठा आहे मान क्रांतिकारी इतिहासा बरोबरदैदिप्यमान भविष्य आम्ही घडवतोमहाराष्ट्र देशा स्वाभिमानानेभारताचेही […]

शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश : शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर

इगतपुरीनामा न्यूज, दि. 30ऑनलाईन शिक्षणासह सर्व बाबी पूर्ण झाल्याने शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी लिहलेल्या पत्रानंतर व फोनवरून चर्चा केल्यानंतर शिक्षण संचालक यांनी शुक्रवारी सायंकाळी शाळा, कॉलेजेसच्या मे महिन्याच्या सुट्टीबाबत परिपत्रक काढले आहे. वडिलांच्या निधनाने दुःखात असूनही शिक्षणमंत्री यांनी तातडीने या प्रस्तावाला मान्यता दिली, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली असून […]

error: Content is protected !!