दिलासादायक : ‘कोरोनामुक्त’ची आकडेवारी ‘कोरोनायुक्त’ पेक्षा ठरतेय वरचढ

इगतपुरीनामा न्यूज दि. ५ :

इगतपुरी तालुक्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण बऱ्यापैकी वाढतांना दिसत असून कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढत असल्याने दिलासा मिळतांना दिसत आहे. आज तालुक्यात ४५ जणांनी आज एकाच दिवशी कोरोनावर मात केली असून कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या शासकीय अहवालानुसार ३८ नव्या संशयीत रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून आज दिवस अखेर ३४६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती इगतपुरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी ‘इगतपुरीनामा’शी बोलतांना दिली आहे.
दरम्यान कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची आकडेवारी नव्याने पॉजिटिव्ह रुग्णांपेक्षा वाढती आहे ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब असली तरी नागरिकांनी अजूनही काटेकोर काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी सतर्क राहून काळजी घेतली तर थोड्याच दिवसात इगतपुरी तालुका नक्की कोरोना मुक्त होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. मात्र त्याची सर्वस्वी जबाबदारी नागरिकांची आहे.

कोरोनाला आपण घ्यायला गेलो तरच तो आपल्याकडे येतो, आपण घ्यायलाच गेलो नाही तर तो कधीच तुमच्या घरी येणार नाही. त्यामुळे त्याला आणायला बाहेर जाऊ नका.” अशा मिश्किल प्रतिक्रिया ‘इगतपुरीनामा’च्या वाचकांकडून येत आहेत.