श्रीमती वैशाली भामरे
जि. प. शाळा माणके
ता. मालेगाव, जि. नाशिक
संपर्क : 7447302081
महाराष्ट्र आपुले आहे महान
आम्हास वाटे त्याचा अभिमान
धर्म जात संस्कृतीने इथल्या
भरलाय नसानसात स्वाभिमान
मराठी आमुची बोलीभाषा
तिचा गोडवा आहे अपरंपार
सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांची
इतिहासात कीर्ती आहे फार
कोकण खान्देश विदर्भ मराठवाडा
महाराष्ट्राच्या आमुची आहे शान
साहित्य संस्कृती कला क्षेत्राला
साऱ्या देशामध्ये मोठा आहे मान
क्रांतिकारी इतिहासा बरोबर
दैदिप्यमान भविष्य आम्ही घडवतो
महाराष्ट्र देशा स्वाभिमानाने
भारताचेही नेतृत्व आम्हीच करतो
म्हणून अभिमान वाटतो नेहमी
मी मराठीचा शिलेदार असल्याचा
कर्तृत्व अन् नेतृत्वाच्या पुण्यभूमीचा
मी ही भूमिपुत्र म्हणवुन घेण्याचा..
Comments