विद्यार्थ्यांच्या पर्यायी शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक – मागासवर्गीय शिक्षक संघटना

इगतपुरीनामा न्यूज दि. ७ : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या वतीने इगतपुरी पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी राजेश तायडे यांचा आज सत्कार करण्यात आला.

सत्कार प्रसंगी शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्न सोडविण्याबरोबरच कोविड काळात शासन स्तरावरून आदेशाची वाट न पाहता विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण कसे सुरू ठेवता येईल, यासाठी उपाययोजना संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावर उपाययोजना म्हणून आदिवासी शिक्षक संघटनेमार्फत सुचीत करण्यात आले की, तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घेऊन E – content तयार करून अथवा तालुक्यातील ज्या शिक्षकांकडे E – Content तयार असेल त्यांच्याकडून एकत्रितपणे इयत्तावार आणि विषयवार यंत्रणेकडून तालुक्यातील प्रत्येक शाळेपर्यंत कसे पोहचवता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.

मागील शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी ऑनलाईनच्या मर्यादा लक्षात घेणेही गरजेचे आहे. त्यासाठी ऑफलाईन शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहचवता येईल याबाबत प्रयत्न करण्याची गरज गरज आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना सर्वार्थाने प्रयत्नशील असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

तालुक्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये चालू वर्षी नव्याने प्रवेशीत इयत्ता १ ली आणि मागील वर्षीची इयत्ता दुसरीच्या १०० % विद्यार्थ्यापर्यंत कसे पोचता येईल यावर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.

गटशिक्षणाधिकारी राजेश तायडे व शिक्षण विस्तार अधिकारी एस.आर. अहिरे, एन.डी मोरे, बी.पी. मोरे, केंद्रप्रमुख अकबर शेख आदी मान्यवरांसह आदिवासी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे, जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष वैभव गगे, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास बोढारे, जिल्हा सल्लागार अनिल बागूल, संतोष श्रीवंत, सिद्धार्थ सपकाळे, सचिन गायकवाड, दशरथ सोनवणे, रमेश रोकडे आदी शिक्षक बांधव यावेळी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!