शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांची इगतपुरी तालुक्यातील विविध शाळांना भेट

इगतपुरीनामा न्यूज दि. १५ : उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आज जिल्ह्यातील शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. आज नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर यांनी इगतपुरी तालुक्यातील विविध शाळांना भेट दिली. यावेळी त्यांनी प्रशासकीय बाबींची पाहणी करून समाधान व्यक्त केले आणि कामकाज संबंधी सूचना दिल्या. इगतपुरी बीटातील चांदवाडी आणि टिटोली जिल्हा परिषद शाळेची प्रत्यक्ष पाहणी करून कमकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. आदिवासी प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती तळपाडे यांनी विविध प्रश्नांच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी म्हसकर यांच्याशी चर्चा केली. इगतपुरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजेश तायडे, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक मुंडे, अहिरे यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.